शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय पाेलीस भरती घेऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय पाेलीस भरती घेऊ नका, अशी मागणी काॅंग्रेसव ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय पाेलीस भरती घेऊ नका, अशी मागणी काॅंग्रेसव व युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अहेरी येथे कार्यक्रमासाठी जिल्ह्यात आले असता, काॅंग्रेस व युवक काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात, गडचिराेली हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जाते. परंतु जिल्ह्यात ४२ टक्केच्यावर गैरआदिवासी आहेत. तरी सुद्धा ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून सहा टक्क्यावर आणण्यात आले. त्यामुळे ओबीसी युवकांवर अन्याय झाला आहे. जिल्ह्यात पाेलीस भरती करायची असल्यास ओबीसींचे आरक्षण १९ टक्के करावे, त्यानंतरच पदभरती करावी, ज्याप्रमाणे राज्यात मराठा आरक्षणाचा विषय सुरू असतानाच त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवून पदभरती करण्याचा निर्णय शासनाने केला असला तरी राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसी आरक्षण कमी करण्यात आले आहे, त्या जिल्ह्यातील ओबीसी युवकांवर पाेलीस भरतीमध्ये माेठा अन्याय हाेणार आहे.

राज्यातील आठ जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९९७ पासून १९ टक्क्यावरून ६ ते ९ टक्क्यावर आणून ओबीसींच्या संविधानिक हक्काची पायमल्ली केली आहे. गडचिराेली जिल्ह्यात ६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे गडचिराेलीसह राज्याच्या इतर जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करूनच राज्यभर पाेलीस भरती प्रक्रिया राबवावी, अन्यथा आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत माेटघरे, नंदू वाईलकर, गाैरव येनप्रेड्डीवार यांनी दिला.