शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बालिका विद्यालयातील उपक्रमांचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक

By admin | Updated: January 9, 2016 01:58 IST

दैनंदिन शिक्षणाबरोबरच विद्यार्थिनींच्या सर्वांगिण विकासासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय भामरागडच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

भामरागड येथील शाळा : विद्यार्थिनींनी घेतले व्यावसायिक शिक्षणभामरागड : दैनंदिन शिक्षणाबरोबरच विद्यार्थिनींच्या सर्वांगिण विकासासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय भामरागडच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी कौतुक केले आहे. शाळाबाह्य मुलींची शाळा म्हणून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची ओळख आहे. मागील वर्षी या शाळेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल ९२ टक्के एवढा लागला. विद्यार्थिनींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी व्यावसायिक शिक्षणही या विद्यालयात दिले जाते. व्यावसायिक शिक्षणाअंतर्गत बांबूचे साहित्य तयार करून त्याची बाजारपेठेत विक्री करणे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. जिल्हा व्यवस्थापन समितीची सभा सोमवारी पार पडली. या सभेदरम्यान उपक्रमांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. सदर उपक्रम जाणून जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर मुख्याध्यापिका एम. बी. मोडपल्लीवार, तहसीलदार अरूण येरचे, गटशिक्षणाधिकारी एम. के. दरडमारे यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सत्कार केला. यावेळी उपशिक्षणाधिकारी राऊत, जिल्हा समन्वयक लता चौधरी, कार्यकारी अभियंता भरडकर यांच्यासह सर्व समित्यांचे सदस्य उपस्थित होते.