नरहरी महाराज पुण्यतिथी आयाेजनाबाबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:52 IST2021-02-05T08:52:55+5:302021-02-05T08:52:55+5:30

गडचिरोली : चामाेर्शी मार्गावरील साईमंदिर परिसरात ललित पोगरे यांच्या निवासस्थानी साेनार समाज संस्थेची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत नरहरी ...

Discussion on Narhari Maharaj Punyatithi project | नरहरी महाराज पुण्यतिथी आयाेजनाबाबत चर्चा

नरहरी महाराज पुण्यतिथी आयाेजनाबाबत चर्चा

गडचिरोली : चामाेर्शी मार्गावरील साईमंदिर परिसरात ललित पोगरे यांच्या निवासस्थानी साेनार समाज संस्थेची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीत नरहरी महाराज पुण्यतिथी आयाेजनासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष बंडुजी कारेमोरे होते. याप्रसंगी समाजाचे उपाध्यक्ष डेडुजी बेहरे, अलका खरवडे, रामभाऊ काळबांधे, अरुण पोगळे, ललित पोगरे, जगदीश डोमळे, राजू कावळे, दत्तात्रय खरवडे उपस्थित हाेते. प्रजासत्ताकदिनी राज्य शासनाद्वारे काढण्यात आलेल्या संतमेळा रॅलीत संत नरहरी महाराजांच्या देखाव्याला स्थान मिळाल्याबद्दल बैठकीत शासनाचे आभार मानण्यात आले. दरवर्षीप्रमाणे १ मार्चला नरहरी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम आयाेजित करण्याचे ठरविण्यात आले, तसेच समाजमंदिराची जागा, समाजाचे सर्वेक्षण करण्याविषयी चर्चा करून समाजभवन उभारणीत संपूर्ण सोनार बांधवांनी सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त करून समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. बैठकीला बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Discussion on Narhari Maharaj Punyatithi project