धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतला काेराेना स्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:39 AM2021-05-11T04:39:09+5:302021-05-11T04:39:09+5:30

यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण वानखेडे आदी उपस्थित ...

Dharmarao Baba Atram reviewed the situation in Kerala | धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतला काेराेना स्थितीचा आढावा

धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतला काेराेना स्थितीचा आढावा

googlenewsNext

यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण वानखेडे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते राष्ट्रीय अर्थ कुटुंबसाहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. तसेच शिधापत्रिका व जात प्रमाणपत्राचेही वितरण करण्यात आले.

प्रत्येक नागरिक व १८ वर्षांवरील युवक-युवतींनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे आवाहन आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी करून लसीकरण हेच कोरोनाला रोखण्यासाठी व जीव वाचविण्यासाठी वरदान व फायदेशीर ठरणार असल्याचेही आवर्जून सांगितले. संजय गांधी, श्रावण बाळ योजनेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी कटाक्षाने लक्ष घालण्याचे निर्देश संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या नव्याने गठीत झालेल्या तालुका समितीलाही निर्देश दिले. आढावा बैठकीला अमोल मुक्कावार, लक्ष्मण येरावार, सुरेंद्र अलोने, किशोर करमे, पराग पांढरे, सुमित मोतकुलवार आदी उपस्थित होते.

Web Title: Dharmarao Baba Atram reviewed the situation in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.