जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान ‘कालेश्वरम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 09:33 PM2019-03-03T21:33:11+5:302019-03-03T21:33:43+5:30

सिरोंचा तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या व तेलंगणा राज्यात समाविष्ट असलेल्या कालेश्वरम येथे देवस्थान आहे. हे देवस्थान गडचिरोली जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धांस्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विशेषत: अहेरी उपविभागातील हजारो भाविक कालेश्वरम मंदिरात दर्शनासाठी गर्दी करीत असतात.

The devotees of the district 'Kalshwaram' | जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान ‘कालेश्वरम’

जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान ‘कालेश्वरम’

Next
ठळक मुद्देशेकडो भाविक जाणार : विविध धार्मिक कार्यक्रम;महाप्रसादाचेही होणार वितरण

रमेश मारगोनवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : सिरोंचा तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या व तेलंगणा राज्यात समाविष्ट असलेल्या कालेश्वरम येथे देवस्थान आहे. हे देवस्थान गडचिरोली जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धांस्थान आहे. महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विशेषत: अहेरी उपविभागातील हजारो भाविक कालेश्वरम मंदिरात दर्शनासाठी गर्दी करीत असतात. यंदाही शेकडो भाविक कालेश्वरम येथे दाखल होणार आहेत.
कालेश्वर-मुक्तेश्वर मंदिरा महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांची गर्दी उसळते. सिरोंचापासून सात किती अंतरावर गोदावरी नदीच्या संगमावर हे मंदिर आहे. १२ ज्योतिर्लींगांपैकी एक मंदिर म्हणून कालेश्वरम मंदिराची ओळख आहे. येथील शिवलिंग प्रसिद्ध आहे. या मंदिराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. देशात जोडलिंग कुठेही आढळून येत नाही. विशेष म्हणजे जोडलिंग केवळ कालेश्वरम मंदिरातच आहे. एक लिंग रूप कालडू म्हणजे यमराज. दुसऱ्या मुक्तेश्वर मुक्ती देवाचे शिवलिंग आहे. या शिवलिंगांमध्ये किती गुंड पाणी टाकले तरी ते दिसणार नाही. सदर पाणी प्राणहिता-गोदावरी नदीच्या संगमात जाते, असा समज भाविकांमध्ये आहे. यमराज (कालडू) शिवजी मंदिरात कसे काय ठेवण्यात आले, याचा इतिहास पुराणामध्ये सांगितलेला आहे. या इतिहासाप्रमाणे, एक दिवस यमराज इंद्रलोकात गेला होता. तेव्हा सर्व भूलोकवासी तेथे सुखशांतीत दिसून आले. तेव्हा यमराज म्हणाले, माझ्या नरक लोकात मला कुणी पूजत नाही. तेव्हा यमराजाने शंकर भगवानाची तपश्चर्या केली. शंकर भगवान या तपश्चर्येला प्रसन्न झाले व त्यांनी तुमचे दर्शन घेतल्याशिवाय स्वर्गामध्ये येणार नाही, मी तुमच्यासाठी भूलोकात एक सुंदर गाव निर्माण करतो, तेथे माझ्यासोबत तुमचीही एक मूर्ती ठेवण्यात येईल. महाशिवरात्रीनिमित्त भाविक या मूर्तीची पूजा करतील. पूजा करणाऱ्यांना स्वर्गात स्थान मिळेल, असे भगवान शंकरांनी इंद्र देवाला सांगितले, अशी पौराणिक मान्यता आहे.

Web Title: The devotees of the district 'Kalshwaram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.