शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडातील ऐतिहासिक वास्तू नष्ट हाेण्याचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST

वैरागड : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या वैरागड येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती माता व हेमाडपंती मंदिरे ...

वैरागड : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या वैरागड येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती माता व हेमाडपंती मंदिरे आहेत; मात्र या मंदिरांच्या डागडुजीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने ही मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेत.

वैरागड येथील लाख मोलाच्या स्थळांची दुर्दशा मन खिन्न करणारी आहे. गावाच्या पूर्वेला वैलोचना नदीच्या तीरावर गोरजाई मंदिर आहे. मागील १० वर्षांपासून माना समाज बांधव डिसेंबर महिन्यात याठिकाणी यात्रा भरवितात. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिराची भग्न अवस्था निर्माण झाली आहे. मंदिराच्या घुमटाची गोरजाई देवस्थान समितीने थोडीफार दुरुस्ती केली; पण मंदिराच्या सुरेख सभामंडपाचे दगड फुटले आहेत. शेकडो वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस सहन करत असलेल्या मंदिराचा बराच भाग जीर्ण झाला आहे.

ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम भारतीय पुरातत्व विभागाने सन २०१५ मध्ये हाती घेतले. चार-पाच वर्षे किल्ल्याच्या दर्शनी भागातील मुख्य दरवाजाच्या दुरुस्तीचे काम चालले. जानेवारी २०२० पासून किल्ल्याच्या दुरुस्तीचे कायमचे थांबले. २१ एप्रिल १९४५ च्या प्राचीन स्मारक तथा पुरातत्त्वीय स्थळ आणि अवशेष १९५८ च्या अंतर्गत वैरागड येथील किल्ला, भंडारेश्वर मंदिर पुरातत्व स्थळ म्हणून घोषित केले आहे. भंडारेश्वर मंदिराच्या डागडुजीचे काम बऱ्याच प्रमाणात झाले.