शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पेपरमिल बंद असूनही स्थायी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन सुरू

By admin | Updated: April 2, 2017 01:40 IST

१५ जून २०१६ पासून आष्टी येथील पेपरमिल पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार बंद आहे.

पत्रकार परिषद : मजदूर सभा युनियनचे आरोप बिनबुडाचे आष्टी : १५ जून २०१६ पासून आष्टी येथील पेपरमिल पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार बंद आहे. खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींनी याबाबत कधी विचारणा केलेली नाही. १० महिन्यापासून मिल बंद असूनही मजदूर सभा युनियनचे अध्यक्ष तथा कामगार नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या पुढाकाराने स्थायी कर्मचाऱ्यांचे पगार सुरू असणारी ही एकमेव मिल आहे, अशी माहिती पेपरमिल मजदूर सभा युनियनचे महासचिव बी. सी. बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जि.प. सदस्य रूपाली पंदिलवार, संजय पंदिलवार, सतीश खेडीकर, श्रीधर भगत, प्रदीप मुखर्जी, रामचंद्र बामणकर, दुशांत चांदेकर, शंकर मारशेट्टीवार, पंकज पस्पुलवार, सुधाकर अल्लेवार, दिलीप शेख, सर्वेश श्रीवास्तव, डी. एल. झाडे, सत्यजीत रॉय, के. पी. मंडल, बी. एम. खोब्रागडे आदी उपस्थित होते. १० महिन्यात कंपनीला उत्पन्न नसतानाही आॅगस्ट २०१६ ला १ कोटी ४ लाख रूपये वाढीव वेतनाची रक्कम, २०१५-१६ मध्ये ९० लाख रूपयांचा बोनस, सहा लाख रूपये वैद्यकीय बिल, सहा लाख रूपये शिष्यवृत्ती वाटप, जून ते सप्टेंबर २०१६ पर्यंत दोन कोटी पुरवणी वेतन कामगारांना टप्प्याटप्प्याने देण्यात आले. त्यामुळे मजदूर सभा युनियन कामगारांच्या पाठीशी असून मान्यता प्राप्त झाल्यानंतर आतापर्यंत सात वेतन करार केलेले आहे. शिवाय कामगारांना अनेक सोयीसुविधा कंपनीकडून मिळवून दिलेल्या आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शॉर्टसर्किटने आष्टी पेपरमिलला लागली आग बीजीपीपीएल व अवंता होर्डींग्ज लिमिटेड पेपरमिलमध्ये १३ मार्च २०१७ ला आग लागली. आग विद्युत अधिनियम २००३ व केंद्रीय प्राधिकरण अधिनियम २०१० अन्वये २० मार्चच्या पत्रकानुसार गडचिरोलीच्या विद्युत निरिक्षकांनी सदर आग ही शॉर्टसर्कीटने लागली, असा खुलासा केला. गडचिरोली जिल्हा कामगार संघाने राजकीय षड्यंत्र रचून विरोधकांनी पेपरमिल व्यवस्थापन व मजदूर सभा युनियन यांनी आग लावल्याचा आरोप केला होता. हे आरोप पूर्णत: बिनबुडाचे आहेत, असा खुलासा यावेळी केला.