शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

२२ वर्षांनंतरही देसाईगंजला बसस्थानक नाही

By admin | Updated: January 7, 2015 22:52 IST

२८ हजार ६७५ लोकसंख्या असलेल्या देसाईगंज शहरात मागील २२ वर्षांपासून बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याकडे अद्यापही शासनाने लक्ष दिलेले नाही. ज्या रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराचे

स्वच्छतेचा बोजवारा : रेल्वे फाटकाने डोकेदुखी वाढविलीमहेंद्र चचाणे - देसाईगंज२८ हजार ६७५ लोकसंख्या असलेल्या देसाईगंज शहरात मागील २२ वर्षांपासून बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याकडे अद्यापही शासनाने लक्ष दिलेले नाही. ज्या रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे, त्या ठिकाणी भूमिगत पुलाचे बांधकाम रखडले आहे. याशिवाय शहराचे अनेक प्रश्न सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. त्यामध्ये स्वच्छता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. देसाईगंज शहराला अनेक समस्यांनी ग्रासले असून यामध्ये बसस्थानकाचा अभाव, रेल्वे फाटकामुळे दररोज नागरिकांना तासभर थांबावे लागते. त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी तसेच शहराच्या प्रभागांमध्ये स्वच्छतेचा अभाव व वाढते अतिक्रमण या मुद्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तालुक्याची निर्मिती होऊन २२ वर्ष झाले. परंतु अजुनही या शहराला बसस्थानक मिळालेले नाही. बसस्थानकाच्या इमारतीसाठी कधी आरमोरी मार्गावर तर कधी कुरखेडा मार्गावर जागा निश्चित करण्यात आली, असे सांगण्यात येते. मात्र अजुनही बसस्थानक कुठे होणार या मुद्यावरच शासनाला निर्णय घेता आले नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेलगत छोट्या शेडमध्ये बस निवारा सुरू आहे. भूयारी रेल्वे पुलाचा तिढारेल्वे मार्ग शहरातून गेला असल्याने या शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. दक्षिणेकडील बाजारपेठ, शासकीय कार्यालय, स्टेडीयम आहे. तर उत्तरेकडील भागात रहिवासी वस्ती आहे. चंद्रपूर ते गोंदिया या रेल्वे मार्गावर असलेल्या वडसा (देसाईगंज) रेल्वे स्थानक येथून दररोज ५ ते ८ वेळा एक्सप्रेस गाड्या, साध्या प्रवाशी गाड्या व माल गाड्या धावत असतात. प्रत्येक गाडीच्या आवागमनाला १५ ते २० मिनिटांपूर्वी रेल्वे फाटक बंद केले जाते. त्यामुळे दक्षिण व उत्तर बाजुला वाहनांची प्रचंड रांग लागते. त्यामुळे दररोज ५ ते ८ वेळा अर्धा ते एक तास वाहतुकीची कोंडी होते. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मागील सहा महिन्यांपूर्वी भूमिगत रेल्वे पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु ते सध्या संथगतीने सुरू आहे. या संदर्भात ३१ मार्चपर्यंत काम मार्गी लावा, असे खा. अशोक नेते यांनी रेल्वेच्या संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.