पाेलीस अधिकारी व कर्मचारी कर्जापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST2021-01-14T04:30:25+5:302021-01-14T04:30:25+5:30

गडचिराेली : दीड वर्षापूर्वी घरबांधणीसाठी पाेलीस महासंचालकांकडे कर्ज प्रस्ताव पाठविण्यात आले हाेते. परंतु, कर्ज मंजूर झाले नाही. राज्यातील जवळपास ...

Deprived of pales officers and staff loans | पाेलीस अधिकारी व कर्मचारी कर्जापासून वंचित

पाेलीस अधिकारी व कर्मचारी कर्जापासून वंचित

गडचिराेली : दीड वर्षापूर्वी घरबांधणीसाठी पाेलीस महासंचालकांकडे कर्ज प्रस्ताव पाठविण्यात आले हाेते. परंतु, कर्ज मंजूर झाले नाही. राज्यातील जवळपास तीन हजार पाेलीस अधिकारी व कर्मचारी कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत कर्ज मंजूर न केल्यास मंत्रालयासमाेर आंदाेलन छेडण्यात येईल, असा इशारा पाेलीस बाॅइज असाेसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला. मागील सात महिन्यांपासून संघटनेेच्या वतीने गृहमंत्री तसेच पाेलीस महासंचालकांकडे वारंवार पाठपुरावा केला जात आहे. परंतु, काहीच उपयाेग झाला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. परंतु, कार्यवाही झाली नाही. अनेक पाेलीस अधिकारी व कर्मचारी कर्जापासून वंचित असल्याने त्यांचे घराचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. ३१ जानेवारीपर्यंत कर्ज मंजूर न केल्यास आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष गिरीश काेरामी, उपाध्यक्ष आकाश ढाली, सचिव अक्षय उसेंडी, श्रीकांत काेडापे, मनाेज धरणी, अभिलाष येनगंटीवार, ओमप्रकाश वट्टी, तिशांत वाचामी, वैभव सुधांशू आदींनी दिला आहे.

Web Title: Deprived of pales officers and staff loans