शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तलावाचे सीमांकन होणार

By admin | Updated: May 28, 2016 01:28 IST

पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील गोकुलनगर लगतच्या एकमेव तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश : तीन विभागाच्या संयुक्त पथकाकडून सर्वेक्षणास प्रारंभगडचिरोली : पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील गोकुलनगर लगतच्या एकमेव तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनापासून मंत्रालयस्तरापर्यंत तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेत नवे जिल्हाधिकारी ए. एस .आर . नायक यांनी गडचिरोली तहसीलदारांच्या नावे तत्काळ पत्र काढून यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांनी गुरूवारी तीन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक गठित केले. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी सकाळपासूनच गोकुलनगरच्या तलावात जाऊन अतिक्रमणधारकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.सामाजिक कार्यकर्ते बसंतसिंग बैस यांनी गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचण येत आहे. शिवाय मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. या तलावाच्या पात्रात अनेकांनी पक्की घरे बांधून सरकारी जागा हडपण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे, अशा आशयाची तक्रार नगर पालिका, पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्यानंतर मंत्रालयातही या अतिक्रमणाबाबतची तक्रार पोहोचली. या तक्रारीची दखल घेत नवे जिल्हाधिकारी एएसआर नायक यांनी तत्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. महसूल, पाटबंधारे व नगर परिषद विभागाच्या आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक सर्वेक्षणाच्या कामाला भिडले आहे. गोकुलनगरलगतच्या तलावाचे गडचिरोली व रामपूर या दोन भागात विभाजन आहे. गडचिरोली भागात येणाऱ्या तलावाच्या पात्रात ४७ घरांचे अतिक्रमण आहे. तर रामपूर भागात येणाऱ्या तलावाच्या पात्रात ५० वर अधिक घरांचे अतिक्रमण असल्याची माहिती पथकातील एका तलाठ्यांनी लोकमतला दिली. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संयुक्त पथक गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांच्याकडे अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर सदर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. अहवालावर चर्चा झाल्यानंतर भूमीअभिलेख उपअधीक्षक कार्यालयामार्फत या तलावाचे सीमांकन करण्यात येणार आहे. त्यानंतर अतिक्रमणधारकांना प्रशासनाच्या वतीने नोटीस बजाविण्यात येणार आहे. शासनाकडून सुचना मिळाल्यानंतर नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणाबाबत कारवाईसंदर्भात निर्णय घेत प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे आता प्रथमच कारवाई होईल, अशी आशा शहरवासीयांना आहे. येथील अतिक्रमण हटविल्यास तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पावसाळ्यात धोका पोहोचणारगोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात अनेक घरे तयार करण्यात आली आहेत. पावसाळ्यात शहरातील नाल्यांद्वारे सांडपाणी व पावसाचे पाणी या तलावात जमा होते, त्यामुळे या तलावातील अनेक घरे पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्याची खबरदारी म्हणून प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. गतवर्षी पावसाळ्यापूर्वी तहसील कार्यालयाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर पालिकेच्या वतीने तलाव पात्रातील अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती. असे झाले सर्वेक्षणमहसूल, पाटबंधारे व नगर परिषदेच्या आठ अधिकारी, कर्मचाऱ्याच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी गोकुलनगरलगतच्या तलावात जाऊन घरांची प्रत्यक्ष पाहणी केली. गडचिरोलीच्या तलाठ्यांकडे या तलावात अतिक्रमण केलेल्या कुटुंबधारकांची यादी आहे. या यादीचे अवलोकन करून अतिक्रमीत घराचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ मोजण्यात आले, शिवाय घराचे बांधकाम सुरू असलेल्या जागेची मोजणी करण्यात आली. तसेच अतिक्रमण घर कोणाच्या नावे, त्यातील सदस्य संख्या किती व तलावाच्या पात्रात अतिक्रमण के व्हापासून आहे, याची माहिती घेण्यात आली. अतिक्रमणधारक धास्तावलेप्रशासनाच्या वतीने तलावातील अतिक्रमणधारकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्यामुळे कारवाईच्या भीतीने येथील अनेक अतिक्रमणधारक धास्तावले आहेत. प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.