हळदी मालजवळ उंच पूल बांधण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:39 IST2021-02-11T04:39:02+5:302021-02-11T04:39:02+5:30

सदर मार्गावरून एसटी महामंडळाच्या बसेस, दुचाकी, चारचाकी वाहने ये-जा करीत असतात. सदर पुलाची उंची १० ते १५ फूट आहे. ...

Demand for construction of high bridge near Haldi Mal | हळदी मालजवळ उंच पूल बांधण्याची मागणी

हळदी मालजवळ उंच पूल बांधण्याची मागणी

सदर मार्गावरून एसटी महामंडळाच्या बसेस, दुचाकी, चारचाकी वाहने ये-जा करीत असतात. सदर पुलाची उंची १० ते १५ फूट आहे. सदर नाला वैनगंगा नदीला जोडला असून पूल आणि नदी यामधील अंतर एक किमी आहे. वैनगंगा नदीला भरती आल्यानंतर या पुलापर्यंत दाब निर्माण होतो. परिणामी या भागात पाऊस नसला तरी पुलावरील पाणी उतरत नाही. नाल्याच्या पलीकडील हळदी, गणपूर, मुधोली आदी गावातील मजूर याच मार्गाने पावसाळ्यात धान रोवणीसाठी लखमापूर बोरी येथे येतात. तसेच अन्य गावातील नागरिक लखमापूर बोरीला विविध कामानिमित्त येतात. हळदी, गणपूर, जैरामपूर, येनापूर येथील शालेय विद्यार्थी याच मार्गाने चामोर्शी व लखमापूर बोरी येथे शिक्षणासाठी येतात. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात हा मार्ग ठप्प होतो.

Web Title: Demand for construction of high bridge near Haldi Mal