आदिवासी दिनाची सुटी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST2021-01-08T05:58:16+5:302021-01-08T05:58:16+5:30

गडचिराेली : ९ ऑगस्ट २०२१ राेजी आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनतर्फे करण्यात आली ...

Declare a tribal day holiday | आदिवासी दिनाची सुटी जाहीर करा

आदिवासी दिनाची सुटी जाहीर करा

गडचिराेली : ९ ऑगस्ट २०२१ राेजी आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी आदिवासी एम्प्लाॅईज फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यात आदिवासींची संख्या अधिक आहे. आदिवासी दिनाच्या दिवशी जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयाेजन केले जाते. मागील चार वर्षांपासून आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुटी जाहीर केली जाते. यावर्षीसुद्धा सुटी जाहीर करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत येरमे, सरचिटणीस सदानंद ताराम, तालुकाध्यक्ष अमरसिंह गेडाम, धानाेरा तालुकाध्यक्ष ओमप्रकाश सिडाम, वनिश्याम येरमे, खुशालराव शेडमाके, आनंद मडावी, चेतन जमकातन, ऋषी हाेळी, हिरामण उईके, गडचिराेली तालुका शाखा सचिव चंद्रकांत उसेंडी आदी उपस्थित हाेते.

Web Title: Declare a tribal day holiday