शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डेकोरेशन, मंडप व्यावसायिकांना उत्सवाने आणले अच्छे दिन

By admin | Updated: September 11, 2016 01:29 IST

गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव हे आता लागूनच असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात डेकोरेशन व मंडप

शेकडो हातांना काम उपलब्ध : रात्रंदिवस एक करून उभारले जात आहेत शामियानेगडचिरोली : गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, शारदा उत्सव हे आता लागूनच असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात डेकोरेशन व मंडप व्यावसायिकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात काम वाढून गेले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात ६८५ सार्वजनिक गणेश मंडळ असून जवळजवळ १२ हजारावर अधिक घरगुती गणपती आहे. जवळजवळ एवढेच दुर्गा व शारदा मंडळही असून यांच्याकडून उत्सव साजरे केले जातात. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी येथील दुर्गा उत्सव विदर्भाच्या विविध भागात प्रसिध्द आहे. या उत्सवासाठी मोठे देखावेही तयार केले जातात. गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात दसरा हा सणही उत्सवात साजरा केला जातो. या सर्व सणासुदीमुळे सध्या गडचिरोलीसह शहरी व ग्रामीण भागातील मंडप व डेकोरेशन व्यावसायिकांकडे प्रचंड काम वाढले आहे. जवळजवळ १० हजारावर अधिक मजुरांना मंडप बांधणीचे काम उपलब्ध झाले आहे. याशिवाय ज्येष्ठ गौरी, गणपती यांचेही काम कॅटरिंग व्यावसायिकांना मिळत असून अनेक कॅटरिंग व्यावसायिकांनी मंडप डेकोरेशनचेही काम सुरू केले आहे. त्यामुळे २४ तास राबणारे शेकडो हात या कामात गुंतलेले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून घरोघरी भोजनावळींना कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरूवात होऊन जाते. गणेशोत्सवाच्या काळात अनेक सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप व डेकोरेशन उभारणीचे काम आमच्याकडे येत असते. त्यामुळे या सर्वांना साहित्य पुरविण्यासोबतच सेवा द्यावी लागते. दिवाळीपर्यंत आता मंडप व डेकोरेशनचा व्यवसाय तेजीत राहणार आहे.- मुखरूजी आभारे, गडचिरोली