शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्ली रूग्णालयातील सौरदिवे दूर करणार अंधार

By admin | Updated: October 18, 2014 23:25 IST

परिसरात असलेल्या विद्युतच्या समस्येवर कायमचा तोडगा म्हणून एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात सौर विद्युतची यंत्रणा उभारण्यात येत असून एका महिन्यात ग्रामीण रूग्णालयाचा परिसर सौर

एटापल्ली : परिसरात असलेल्या विद्युतच्या समस्येवर कायमचा तोडगा म्हणून एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात सौर विद्युतची यंत्रणा उभारण्यात येत असून एका महिन्यात ग्रामीण रूग्णालयाचा परिसर सौर दिव्यांनी उजाळणार आहे. एटापल्ली हे तालुकास्थळ असले तरी या गावापर्यंत पोहोचलेली विद्युत शेकडो किलोमिटर जंगलातून आली आहे. त्यामुळे थोडाही वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्यास जंगलातील एखादे झाड कोसळून विद्युत पुरवठा खंडित होतो. सदर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्याच दिवशी जंगलात जाणे विद्युत कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे एकदा खंडित विद्युत पुरवठा किमान २ दिवस पूर्ववत सुरू होत नाही. ही नित्याचीच बाब बनली आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने रूग्णालय प्रशासनाने लाखो रूपये खर्चून सौर दिव्यांची यंत्रणा बसविण्याचे काम सुरू केले आहे. रूग्णालयातील वार्डांसह बाहेरच्या परिसरातही सौरदिवे लावण्यात आले आहेत. सौरदिवे प्रकाशित होण्याबरोबरच रूग्णालयातील अत्यावश्यक साधनेही चालतील, याची व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेली सौर उर्जेची प्रचंड यंत्रणा लक्षात घेता हे सहज शक्य होणार आहे. एटापल्ली येथे उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना आजपर्यंत विद्युत खंडित झाल्यानंतर अंधाराचा सामना करावा लागत होता. मात्र या यंत्रणेमुळे एटापल्ली येथील ग्रामीण रूग्णालयात नेहमीच प्रकाशमान राहील, अशी अपेक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)