शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

दराचीवासीयांनी श्रमदानातून उभारली विद्यार्थ्यांसाठी गवत व बांबूची कुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 6:00 AM

गावात असलेली शाळेची इमारत जीर्ण झाल्याने यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीपासून दराची येथील शाळा गावापासून जवळपास ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीत भरविली जात आहे. या ठिकाणी एकच वर्गखोली आहे. एका वर्गखोलीत चार वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिकविणे कठीण होत होते. तसेच शालेय पोषण आहाराचे साहित्य, शैक्षणिक साहित्य, टेबल खुर्च्या, सोबतच दोन शिक्षकांसाठी दोन टेबल व दोन खुर्च्या एवढे साहित्य ठेवून अध्यापन करणे कठीण होत होते.

ठळक मुद्देचार वर्ग भरत होते एकाच खोलीत : वर्गखोली बांधण्यास विलंब होत असल्याने पालकांनी शोधला स्वत:च उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : चार वर्गांसाठी एकच वर्गखोली असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची फार मोठी घुसमट होत होती. सरकारी काम व लांबचलांब या मनी प्रमाणे जि.प.ने वर्गखोली मंजूर केली. मात्र बांधकाम कधी होणार हे निश्चित नाही. तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे येत असल्याने दराचीवासीयांनी श्रमदानातून बांबू व गवताची आकर्षक कुटी बनविली. या कुटीचा उपयोग वर्गखोली म्हणून केला जात आहे.गावात असलेली शाळेची इमारत जीर्ण झाल्याने यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या सुरूवातीपासून दराची येथील शाळा गावापासून जवळपास ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका इमारतीत भरविली जात आहे. या ठिकाणी एकच वर्गखोली आहे. एका वर्गखोलीत चार वर्गांच्या विद्यार्थ्यांना शिकविणे कठीण होत होते. तसेच शालेय पोषण आहाराचे साहित्य, शैक्षणिक साहित्य, टेबल खुर्च्या, सोबतच दोन शिक्षकांसाठी दोन टेबल व दोन खुर्च्या एवढे साहित्य ठेवून अध्यापन करणे कठीण होत होते. ही बाब मुख्याध्यापकांनी दराचीवासीयांच्या लक्षात आणून दिल्यानंतर दराचीवासीयांनी ४० फूट व्यासाची बांबू व गवताची कुटी उभारून दिली. या वर्गखोलीत वर्ग भरण्यास सुरूवात झाली आहे. कुटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरूकुलातील शिक्षण पध्दतीचा अनुभव येत आहे. कुटी उभारण्यासाठी मुख्याध्यापक वसंतराव गुरनुले, सहायक शिक्षक राजेश्वर कुनघाडकर यांच्यासह गावपाटील लच्चुराम उईके, शाळा समिती अध्यक्ष रामू उईके, संतोष ऐक्का, ग्रामसभा सचिव अवसू नरोटे, ग्रामसभा अध्यक्ष प्रमोद तुलावी, रमाबाई मडावी यांनी विशेष पुढाकार घेतला.स्वत:च शोधला उपायजिल्ह्यातील अनेक शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या जीर्ण इमारतींमध्येच वर्ग घेतले जात आहेत. मात्र दराचीवासीयांनी शासनाच्या भरवशावर अवलंबून न राहता स्वत:च्या मुलांसाठी स्वत:च कुटी उभारून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. इतर शाळांसाठी ही शाळा व गाव प्रेरणायी ठरणारे आहे.शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली शाळेला भेटश्रमदानातून कुटी उभारून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. ही बाब शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांना माहित झाल्यानंतर त्यांनी स्वत: १० जानेवारी रोजी शाळेला भेट दिली. यावेळी उपशिक्षणाधिकारी एम. एन. चलाख, केंद्र प्रमुख वसंत भुरे, विस्तार अधिकारी सुधीर आखाडे, छत्रपती मडावी आदी उपस्थित होते. या सर्वांनी गावकरी व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांची चाचणी घेतली असता, विद्यार्थी अभ्यासातही हुशार असल्याचे दिसून आले.एकाच वर्गखोलीत चार वर्ग बसविणे कठीण होत होते. ही बाब ग्रामस्थांना लक्षात आणून दिली असता, गावकऱ्यांनी शाळेच्या परिसरातच कुटी उभारून दिली. या कुटीत आता अध्यापन सुरू आहे. शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी सुध्दा स्वतंत्र कुटी बनविली आहे. गावातील नागरिकांनी सहकार्य केल्याने हे शक्य झाले आहे.-वसंतराव गुरनुले, मुख्याध्यापक

टॅग्स :Schoolशाळा