शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदारांसाठी धोक्याची घंटा

By admin | Updated: May 17, 2014 00:13 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. यामध्ये चार ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. यांच्या मतदार संघामध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला कुठेही बहुमत मिळालेले नाही.

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. यामध्ये चार ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. यांच्या मतदार संघामध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला कुठेही बहुमत मिळालेले नाही. भाजपच्या झंझावतात काँग्रेस आमदारांच्या मतदार संघातही कमळ बहरले. १0 वर्षापासून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आमदार आनंदराव गेडाम यांच्या मतदार संघात काँग्रेसला ४२ हजार ६७७ मताचा फटका बसला आहे. डॉ. उसेंडी प्रतिनिधीत्व करीत असलेल्या गडचिरोली क्षेत्रात ६९ हजार ९, रामरतन राऊत प्रतिनिधीत्व करीत असलेल्या आमगाव निर्वाचन क्षेत्रात २६ हजार ६२, माजी राज्यमंत्री आमदार विजय वडेट्टीवार प्रतिनिधीत्व करीत असलेल्या या क्षेत्रामध्ये २५ हजार ५२ मतांचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसला. गडचिरोली जिल्ह्याचा विचार करता दोन काँग्रेस आमदारांच्या निर्वाचन क्षेत्रात पक्षाला बसलेला फटका यामागचे प्रमुख कारण या भागात स्थानिक आमदाराप्रती असलेली नाराजी, राज्य सरकारची अँन्टी इनकंबन्शी, कार्यकर्त्यांपासून दुरावलेले लोकप्रतिनिधी व त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांऐवजी ठेकेदारांचा वाढता गोतावळा या सर्व बाबी पक्षासाठी हानीकारक ठरल्या. तसेच जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हसनअली गिलानी यांच्या प्रती असलेली सर्व मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी व आमदार उसेंडी यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गोतावळा जमू न देण्यात त्यांनी बजाविलेली भूमिका हे ही पराभवाचे एक प्रमुख कारण आहे. तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्रात पक्षाच्या नावावर गेले अनेक वर्ष काम करणार्‍या बड्या काँग्रेस नेत्याने पक्षाच्या विरोधात खुलेआम केलेला प्रचार हाही काँग्रेस पक्षाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला. मोदी लाट देशात असल्याने जिल्ह्यातही सर्व भागात ही लाट दिसून आली. याचा परिणाम पक्षाच्या पराभवात झाला. ओबीसी समाजाचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करण्याचे काम राज्य सरकारने केले नाही व आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांनी या कामासाठी खास पाठपुरावा केला नाही. या सार्‍या नाराजींच्या बाबी काँग्रेस उमेदवार डॉ. उसेंडी यांच्यासाठी कारणीभूत ठरल्या.