शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

सडलेल्या धानाने केले पिकाचे नुकसान

By admin | Updated: July 18, 2014 00:04 IST

आदिवासी विविध सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने उचल केली नाही. सदर धान पूर्णपणे सडले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी या धानावर पडून वाहत

धानोरा : आदिवासी विविध सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने उचल केली नाही. सदर धान पूर्णपणे सडले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी या धानावर पडून वाहत जवळपासच्या धानपिकाच्या शेतीत जात आहे. त्यामुळे सभोवतालचे धानपीक करपायला लागले आहे. सतत तीन वर्षांपासून नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्याला आदिवासी विकास महामंडळाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वामन ऋषी गुरनुले यांनी केली आहे. सुरसुंडी येथील शेतकरी वामन गुरनुले यांनी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेला धानपीक ठेवण्यासाठी कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. धानाचा भाव पडल्याने सदर धान आदिवासी विकास महामंडळाने उचलले नाही. मागील चार वर्षांपासून धान याच ठिकाणी पडून आहे. सडलेल्या धानामुळे सभोवतालच्या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पावसाचे पाणी धानाच्या ढिगावर पडते. त्यानंतर सदर पाणी वाहत गुरनुले यांच्याच शेतामध्ये जाते. सदर पाण्यामुळे गुरनुले यांचे धानपीक दरवर्षी करपून जात आहे. मागील चार वर्षापासून या शेतातील रूपयाचेही पीक झाले नाही. दरवर्षी मात्र त्यांना रोवण्याचा खर्च करावा लागत आहे. धानाची उचल केल्याशिवाय धानपीकाचे उत्पादन घेणे शक्य होणार नाही. गुरनुले यांनी काही कालावधीसाठीच जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र हा करार मोडत त्या ठिकाणचे धान उचलण्यात आले नाही. गुरनुले यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे कोणतेच साधन नाही. दरवर्षीच्या नापिकेमुळे गुरनुले यांना फार मोठा आर्थिक फटका बसला आहे. आदिवासी विकास महामंडळाने झालेली नुकसान भरपाई द्यावी, त्याचबरोबर धान ठेवल्याचे भाडेसुध्दा द्यावे, अशी मागणी उपप्रादेशिक अधिकारी व उपविभागीय अधिकारी व धानोरा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणचे धान्य आदिवासी विकास महामंडळाने उचलले नाही. गावाजवळ असलेल्या धानाच्या ढिगामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)