शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कर्मचाऱ्यांची वेतनकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

कोरोनाच्या संचारबंदीदरम्यान जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडून इतरत्र भटकू नये असा आदेश प्रशासनाने जारी केला. याशिवाय कोण केव्हापासून गायब आहे याची माहिती घेतली जात आहे. मुख्यालयी अनुपस्थित आढळलेल्या आणि विनापरवानगी मुख्यालय सोडून जाणाऱ्यांची यादी बनविली जात असून त्यांची वेतन कपात केली जाणार आहे.

ठळक मुद्देमुख्यालयी अनुपस्थित । कारणे दाखवा नोटीसला द्यावे लागणार उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या संचारबंदीदरम्यान जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडून इतरत्र भटकू नये असा आदेश प्रशासनाने जारी केला. याशिवाय कोण केव्हापासून गायब आहे याची माहिती घेतली जात आहे. मुख्यालयी अनुपस्थित आढळलेल्या आणि विनापरवानगी मुख्यालय सोडून जाणाऱ्यांची यादी बनविली जात असून त्यांची वेतन कपात केली जाणार आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहातच नाही. आता संचारबंदीमुळे त्यांचे अप-डाऊन बंद झाले आहे. मात्र ५ टक्केच कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहावे या आदेशाचा फायदा घेत अनेक जण चक्क नागपूर, चंद्रपूरला गेले. दरम्यान इकडून-तिकडे जाण्याच्या नादात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचा आदेश न पाळल्यास कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर अनेकांनी आडमार्गाने जिल्ह्यात प्रवेश केला. पण तत्पूर्वीच जि.प. प्रशासनाने मुख्यालयी अनुपस्थित लोकांची माहिती मिळवणे सुरू केले होते. विशेष म्हणजे काही कर्मचारी तर अजूनही मुख्यालयी पोहोचू शकलेले नाही.प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत विविध पंचायत समित्यांमधील १६२ अधिकारी-कर्मचारी अप-डाऊन करत असल्याची तर ३५ जण मुख्यालयी अनुपस्थित असल्याची नोंद जि.प.ने घेतले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत काम करणारे २७ जण अप-डाऊन करत असल्याचे आणि ११ जण मुख्यालयी अनुपस्थित असल्याचे आढळले.या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची आधी वेतन कपात केली जाईल. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. त्या नोटीसचे उत्तर समाधानकारक न मिळाल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद