शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मळणी यंत्र होणार स्वस्त

By admin | Updated: August 14, 2014 23:44 IST

सध्य:स्थितीत जिल्ह्यात उपलब्ध असलेले धान पिकाचे मळणी यंत्र ट्रॅक्टरवर चालतात. ट्रॅक्टरची किंमत ६ ते ७ लाख रूपयाच्या घरात आहे. मळणी यंत्राची किंमत दीड लाख रूपयाच्या दरम्यान आहे.

कृषी विभागाचा सल्ला : पॉवर टिलरवर चालणारे यंत्र बनणारगडचिरोली : सध्य:स्थितीत जिल्ह्यात उपलब्ध असलेले धान पिकाचे मळणी यंत्र ट्रॅक्टरवर चालतात. ट्रॅक्टरची किंमत ६ ते ७ लाख रूपयाच्या घरात आहे. मळणी यंत्राची किंमत दीड लाख रूपयाच्या दरम्यान आहे. एकंदरीत संपूर्ण मळणी यंत्र ८ ते ९ लाख रूपयात पडत असल्याने एवढा खर्च करून प्रत्येक शेतकऱ्याला मळणी यंत्र खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पॉवर टिलरवर चालणारे मळणी यंत्र तयार करण्याचा सल्ला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कंपनीला दिला आहे. तशा प्रकारचे यंत्र बनविण्याची इच्छाही कंपनीने व्यक्त केल्याने पुढील हंगामापासून पॉवर टिलरवर चालणारे मळणी यंत्र उपलब्ध होतील, असा आशावाद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.एकूण शेतीच्या उत्पादनात धान पिकाचा वाटा सुमारे ९० टक्केच्या जवळपास आहे. संपूर्ण जिल्ह्यात धान पिकाचे प्रचंड उत्पादन घेतले जाते. यापूर्वी धान शेतीची बहुतांश कामे मजुरांकरवी केली जात होती. मात्र नुकताच येथील शेतकरी यंत्राच्या सहाय्याने धान पिकाची शेती करू लागला आहे. यावर्षी पहिल्यांदाच रोवणी यंत्राच्या सहाय्याने धानाची रोवणी करण्यात आली. सदर यंत्र जवळपास २ लाख रूपयांमध्ये उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी सदर यंत्र खरेदी केले.धान रोवणीसारखीच धान मळणे वेळेवर होणे अत्यंत महत्वाचे आहे. जिल्ह्यात धान मळणी यंत्र मागील १० वर्षांपासून वापरत आहेत. सदर मळणी यंत्र ट्रॅक्टरवर चालविले जातात. ट्रॅक्टरची किंमत ६ ते ७ लाख रूपये आहे. मळणी यंत्राची किंमत दीड लाखाच्या जवळपास आहे. म्हणजेच संपूर्ण मळणी यंत्राची किंमत ८ लाखांच्या जवळपास जाते. एवढे महागडे यंत्र प्रत्येक शेतकऱ्याला खरेदी करणे शक्य होत नाही. परिणामी १० वर्षानंतरही अगदी मोजक्या शेतकऱ्यांकडे मळणी यंत्र उपलब्ध आहे. त्यामुळे मळणीचा दरही अनेक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. सदर मळणी यंत्र पॉवर टिलरवर चालविणारे बनविल्यास अनेक शेतकरी मळणी यंत्र खरेदी करू शकतील.पॉवर टिलर शेतकऱ्यांना अनुदानावरच उपलब्ध करून दिले जाते. त्याला जोड दीड लाख रूपयांचे मळणी यंत्र अनेक शेतकरी खरेदी करू शकतात. काही बेरोजगार युवकांनाही या मळणी यंत्राच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकते. अशाप्रकारचे मळणी यंत्र बनविण्यात यावे, असा सल्ला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कंपनीला दिला आहे. कंपनीने अशा प्रकारचे मळणी यंत्र बनविण्यास होकारही दिला आहे. सदर मळणी यंत्र पुढील हंगामात उपलब्ध होतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. असे झाल्यास पुढील वर्षी मळणी यंत्रांची टंचाई भासणार नाही. परिणामी अगदी माफक दरात शेतकऱ्यांना मळणी यंत्र उपलब्ध होणार असल्याने त्यांचा खर्च वाचण्यास मदत होईल.