धानोरा (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील युवक आणि भंडारा जिल्ह्यातील युवती या प्रेमी युगुलाने धानोरा येथे युवकाच्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.आपले लग्न घरातील लोकांना मंजूर होणार नाही, या भावनेतून त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लिकेश भेंडारे (२३, रा. पेंढरी जि. गडचिरोली) आणि किरण नंदनवार (१९, भंडारा) अशी त्या दोघांची नावे आहेत. लिकेश हा धानोरा येथे राहून रोजंदारीवर काम करत होता, तर किरण ही धानोरा येथील नातेवाइकांकडे राहात होती. गेल्या वर्षी ती बारावी उत्तीर्ण झाली होती आणि स्थानिक कॉलेजमध्ये शिकत होती. धानोरा येथेच ओळखीतून त्या दोघांचे प्रेम जुळले, पण त्यांच्या या प्रेमाची माहिती दोघांच्याही घरच्यांना नव्हती.सोमवारी सकाळी ११ वाजता किरण कॉलेजला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. ती संध्याकाळपर्यंत आलीच नसल्याने शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, कोणीतरी लिकेश आणि तिच्या प्रेमाबद्दल त्यांना सांगितले. त्यावरून लिकेशच्या खोलीचा शोध घेण्यात आला. त्याच्या खोलीत दोघांचेही मृतदेह छताला शेला आणि ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. विशेष म्हणजे, किरणने आत्महत्येपूर्वी लिकेशने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिला पत्नी म्हणून स्विकारल्याचे चाैकशीत आढळले आहे.
प्रेमी युगुलानं एकाच खोलीत लावून घेतला गळफास; परिसरात एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 07:35 IST
आपले लग्न घरातील लोकांना मंजूर होणार नाही, या भावनेतून त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रेमी युगुलानं एकाच खोलीत लावून घेतला गळफास; परिसरात एकच खळबळ
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}