शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या बसेस निवडणुकीसाठी राखीव

By admin | Updated: September 30, 2014 23:35 IST

१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने इत्थंभूत तयारी सुरू केली आहे. पोलीस विभागही विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.

गडचिरोली : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने इत्थंभूत तयारी सुरू केली आहे. पोलीस विभागही विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, पोलीस विभागाने केंद्रीय राखीव पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दल तसेच जिल्हा पोलीस दलातील जवानांना मतदानस्थळी पाहोचविण्यासाठी महामंडळाच्या बसेस आतापासूनच अधिग्रहीत केल्या असल्याचे दिसून येते. येत्या काही दिवसात जिल्हा निवडणूक विभाग व पोलीस विभाग महामंडळाच्या बसेस, खासगी वाहने अधिग्रहीत करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. निवडणूक विभाग तसेच पोलीस विभागाला १५ आॅक्टोबरची विधानसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महामंडळासोबतच काळी-पिवळी टॅक्सी, ट्रक, मेटॅडोर आदी वाहने लागणार आहेत. पोलीस विभागाने येथील जिल्हा परिषदेच्या बेस कॅम्पमध्ये आतापासूनच महामंडळाच्या बसेस, खासगी ट्रक व मेटॅडोर वाहन आतापासूनच उभ्या केल्या असल्याचे दिसून येते. निवडणूक कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांची परिवहन विभागाच्यावतीने तपासणीही सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेदरम्यान पोलीस विभागातर्फे तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामुळे पोलीस कर्मचारी व जवानांची संख्या लक्षात घेता पोलीस विभागाने १०० बसेसची मागणी केली आहे.