शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी महामोर्चाला कोरोनाने लावला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:09 IST

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी राेजी माेर्चा ...

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी २२ फेब्रुवारी राेजी माेर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. माेर्चाच्या माध्यमातून सरकारला ओबीसींची ताकद दाखवायची असल्याने माेर्चाला लाखांच्या जवळपास नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता होती. त्यासाठी मागील एक महिन्यापासून तयारी सुरू हाेती. गावागावांत बैठका घेतल्या जात हाेत्या. ओबीसी समाजासाेबतच इतरही समाज संघटनांनी या माेर्चाला पाठिंबा दर्शविल्याने माेर्चाची ताकद आणखी वाढली. बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, क्रीडामंत्री सुनील केदार, काॅंगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, खा. अशोक नेते, चंद्रपूरचे खासदार बाळू धानाेरकर, आ. प्रतिभा धानाेरकर, आ. कृष्णा गजबे आदी अनेक नेत्यांनी पाठिंबा दर्शवून माेर्चात सहभागी हाेण्याचे आश्वासन दिले हाेते.

एकीकडे माेर्चाची तयारी जाेरात सुरू असताना दुसरीकडे काेराेनाचे रुग्णही वाढत आहेत. सक्रिय काेराेना रुग्णांची संख्या ५९ वर पाेहाेचली आहे. काेराेनाचे नवीन बाधित प्रामुख्याने गडचिराेली शहरातच आढळून येत आहेत. त्यामुळे माेर्चासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना काेराेनाची लागण हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. काेराेना प्रतिबंधाचे नियम पाळून माेर्चा काढला जाईल, असे आयाेजकांकडून सांगितले जात असले, तरी हजाराेंच्या संख्येत माेर्चेकरी सहभागी हाेणार असल्याने नियम पाळणे अशक्य असल्याची जाणीव आयाेजकांना झाली. त्यामुळे माेर्चा काढावा की नाही याबाबत संदिग्धता वाढत चालली हाेती.

माेर्चाला जिल्हाभरातून समाजबांधव आणण्याची जबाबदारी तालुकास्तरावरील समन्वय समित्यांवर साेपविली हाेती. त्यामुळे माेर्चाबाबत निर्णय घेताना त्यांचेही मत विश्वासात घेणे आवश्यक हाेते. त्यांनी कळविलेल्या निर्णयावरून माेर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने शनिवारी रात्री घेतला.

बाॅक्स

माेर्चाबाबत हे आहेत वेगवेगळे मतप्रवाह

ज्या गडचिराेली शहरात माेर्चा निघणार आहे, त्याच शहरात मागील आठ दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. माेर्चामुळे काेराेनाचा उद्रेक झाल्यास याचे खापर आयाेजकांवर फोडले जाण्याची शक्यता होती. दि.२२ ला माेर्चा काढल्यानंतर ओबीसींच्या मागण्या दुसऱ्याच दिवशी पूर्ण हाेतील असे नाही. त्यासाठी अनेक दिवस लढा द्यावा लागणार आहे. त्यामुळे आता घिसाडघाई करण्यात काहीच अर्थ नाही. माेर्चा पुढेही काढता येईल, पण काेणाच्याही आरोग्याशी खेळणे योग्य नाही, असा एक मतप्रवाह पुढे आला. मागील महिनाभरापासून माेर्चाची तयारी सुरू आहे. शेवटच्या गावापर्यंत जागृती करण्यात आल्याने नागरिक काेराेनालाही न घाबरता माेर्चात सहभागी हाेण्यास तयार हाेते. त्या नागरिकांचा मात्र हिरमाेड हाेईल, असे काहींचे मत आहे.