कंटेनर-टिप्पर समोरासमोर धडकले, दुचाकीस्वार मध्ये अडकले; दोन ठार एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 03:44 PM2023-04-05T15:44:41+5:302023-04-05T15:51:40+5:30

कुरखेडा तालुक्यातील घटना

Container, tipper collided head-on at korchi kurkheda route, two bikers killed and one injured | कंटेनर-टिप्पर समोरासमोर धडकले, दुचाकीस्वार मध्ये अडकले; दोन ठार एक जखमी

कंटेनर-टिप्पर समोरासमोर धडकले, दुचाकीस्वार मध्ये अडकले; दोन ठार एक जखमी

googlenewsNext

सिराज पठाण

कुरखेडा (जि.गडचिरोली) : ऐन घाटात लांबलचक कंटेनर व टिप्पर समोरासमोर धडकले. याचवेळी दोन दुचाकीस्वार या वाहनांत अडकले. या विचित्र अपघातात दोन ठार झाले तर एक जखमी आहे. ५ एप्रिल रोजी दुपारी सव्वा दोन वाजता कुरखेडा तालुक्यातील डोंगरगाव पाटीजवळ ही घटना घडली. रामदास कुंजाम (४५), नागसू कुंजाम (६०) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून रमेश कुंजाम (३५, सर्व रा.मालेवाडा ता.कुरखेडा) हे जखमी आहेत. 

कोरची- कुरखेडा मार्गावर कंटेनर व टिप्परची मोठी रहदारी असते. ५ रोजी दुपारी कंटेनर कंटेनर (सीजी ०४- एनटी- १११३) छत्तीसगडहून महाराष्ट्रात येत होता, तर टिप्पर (एमएच १४ एचयू-१८६२) छत्तीसगडकडे जात होते. डोंगरगावजवळ पाटीजवळील घाटात ही दोन्ही वाहने समोरासमोर धडकली. ही धडक एवढी जबर होती की टिप्पर रस्त्याच्या मधोमध उलटला तर कंटेनरच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, याचवेळी तेथून दुचाकी (एमएच ३३ डी- ९१९६) व अन्य एक दुचाकी जात होत्या. या वाहनांमध्ये अडकनू दोन्ही दुचाकीवरील तिघांना जबर दुखापत झाली. यापैकी दोघे जागीच गतप्राण झाले तर एक गंभीर जखमी आहे. तिघांनाही कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन मृतांसह एक जखमी असे तिघेही मालेवाडा (ता.कुरखेडा) येथील रहिवासी असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. पुराडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

वाहतूक विस्कळीत

अपघातग्रस्त वाहने रस्त्यात आडवी झाली होती. लांबलचक कंटेनर व टिप्पर ऐन रस्त्यात होते, त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग लागली होती. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी भरउन्हात पुराडा पोलिस प्रयत्न करत आहेत.

Web Title: Container, tipper collided head-on at korchi kurkheda route, two bikers killed and one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.