येनापूर येथे रस्ता दुभाजकाची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:33 IST2021-01-18T04:33:40+5:302021-01-18T04:33:40+5:30

आष्टी : जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या आष्टीपासून येनापूरपर्यंत मुख्य मार्गावर रस्ता दुभाजकाची निर्मिती करावी, अशी मागणी ...

Construct a road divider at Yenapur | येनापूर येथे रस्ता दुभाजकाची निर्मिती करा

येनापूर येथे रस्ता दुभाजकाची निर्मिती करा

आष्टी : जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या आष्टीपासून येनापूरपर्यंत

मुख्य मार्गावर रस्ता दुभाजकाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात आ. डाॅ. देवराव हाेळी यांना निवेदन देण्यात आले.

आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते उत्तर दक्षिण दोन किमी मार्गावर दुभाजकाची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी आ. डॉ. होळी यांची भेट घेऊन दुभाजक निर्माण करण्याकरिता पाठपुरावा करण्याची मागणी केली. येनापूर हे गाव चामोर्शी-आष्टी मार्गावर आहे. आजुबाजुला असणारी जवळपास २५ गावे जाेडली आहे. शाळा,महाविद्यालय, बाजार समिती आदी कार्यालये असल्याने येथून मोठी वर्दळ असते. दुभाजकाअभावी येथे अपघात वाढले आहेत. त्यामुळे येथे डिवायडरची नितांत आवश्यकता आहे, असे मनमोहन

बंडावार, दिनेश राऊत, डी.जी. गेडाम, राहुल गुरूकर, सुरेश गुंतीवार, राजू कन्नाके, राजू गेडाम, अनिल गेडाम, सुनील देव्हारे, दिलीप गुंतीवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Construct a road divider at Yenapur