संघटनेकडून दिवंगत शिक्षकाच्या कुटुंबांचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST2021-02-05T08:53:44+5:302021-02-05T08:53:44+5:30

आरमोरी : दिवंगत सेवानिवृत्त शिक्षकांच्या कुटुंबाचे दुःख जाणून घेत त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा उपक्रम सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने सुरू ...

Consolation to the families of the late teacher from the organization | संघटनेकडून दिवंगत शिक्षकाच्या कुटुंबांचे सांत्वन

संघटनेकडून दिवंगत शिक्षकाच्या कुटुंबांचे सांत्वन

आरमोरी : दिवंगत सेवानिवृत्त शिक्षकांच्या कुटुंबाचे दुःख जाणून घेत त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा उपक्रम सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने सुरू केला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरमाेरी येथील अनेक दिवंगत शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या सहचारिणींचे सांत्वन केले. त्यानंतर साडीचोळी भेट स्वरुपात दिली.

या सत्रात मृत्यू झालेल्या संघटनेच्या सदस्यांच्या घरी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना आरमोरीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. भेटीदरम्यान

त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे वेतन उपदान, थकीत प्रकरणे व पेन्शनप्राप्तीसाठी विविध कागदपत्रे संकलित करून कार्यालयात सादर करण्यात आली. काही प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत. दिवंगत सदस्यांच्या पत्नींमध्ये गीताबाई गोपीचंद मने, छाया जसराज वसोया, जयश्री नामदेव गराडे, शकुंतला रामभाऊ मुरवतकर, शकुंतला देवराव अहिरकर, निरुता यशवंत सुरपाम, पुष्पाबाई जनार्दन कुथे, निर्मलाबाई विश्वनाथ कोलते, वत्सलाबाई परशुराम मोरघडे, लीलाबाईं चम्पत सुरणक आदींचा समावेश हाेता. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष वसंत राऊत, उपाध्यक्ष शंकर बोरकर, कार्यकारिणीचे सदस्य आर. टी. राऊत, बी. एम. कुथे, एस. एस. रंधये, डी. जे. खरकाटे, के. बी. ठाकरे, विजय सहारे, एस. टी. राऊत, लीलाबाईं हेमके, शोभा रासेकर, चेतना भोयर, प्रतिमा चांगले उपस्थित होते.

Web Title: Consolation to the families of the late teacher from the organization