शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

संमती 12 हजार पालकांची विद्यार्थी हजर 10 हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 05:00 IST

काेराेनाचा संसर्ग कायम असतानाही शासनाने शाळा सुरू केल्या आहेत. याला काही पालकांचा विराेध आहे. शाळेत आल्यामुळे काेराेनाची लागण विद्यार्थ्यांना झाल्यास पालकांच्या राेषाचा सामना शाळा, शिक्षक व प्रशासनाला करावा लागू नये, यासाठी शाळेत येण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या पाल्याचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २३ नाेव्हेंबर राेजी जवळपास दाेन ते तीन टक्के पालकांनीच संमतीपत्र भरून दिले हाेते. त्यानंतर मात्र संमतीपत्र भरून देणाऱ्या पालकांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देदरदिवशी वाढताहे पटसंख्या, सकारात्मक भूमिका

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २३ नाेव्हेंबपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. गुरूवारपर्यंत ११ हजार ५४५ पालकांनी संमतीपत्र भरून दिले आहेत. त्यापैकी जवळपास ९ हजार विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येत आहेत. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दरदिवशी वर्गातील पटसंख्या वाढत चालली आहे.काेराेनाचा संसर्ग कायम असतानाही शासनाने शाळा सुरू केल्या आहेत. याला काही पालकांचा विराेध आहे. शाळेत आल्यामुळे काेराेनाची लागण विद्यार्थ्यांना झाल्यास पालकांच्या राेषाचा सामना शाळा, शिक्षक व प्रशासनाला करावा लागू नये, यासाठी शाळेत येण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्याला त्याच्या पाल्याचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २३ नाेव्हेंबर राेजी जवळपास दाेन ते तीन टक्के पालकांनीच संमतीपत्र भरून दिले हाेते. त्यानंतर मात्र संमतीपत्र भरून देणाऱ्या पालकांची संख्या वाढत आहे. तसेच शाळेतील उपस्थिती सुध्दा वाढत चालली आहे. शिक्षण विभागामार्फत शाळांच्या सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. काेराेनाची साथ पसरू नये, यासाठी शाळेत काेणत्या उपाययाेजना केल्या जाव्यात याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन केले जात आहे. शिक्षकही पालकांच्या घरी जाऊन शाळेत काेणत्या सुविधा आहेत, हे सांगून पालकांचे मन वळवित आहेत. 

ग्रामीण भागातील शाळांना चांगला प्रतिसादशहर व तालुकास्तरावरील शाळांच्या तुलनेत ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती बऱ्यापैकी असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये तर जवळपास ५० टक्के विद्यार्थी उपस्थित आहेत. दरदिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत चालली आहे.  अध्यापनाचे कामही सुरू झाले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार शाळांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत की नाही. तसेच नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची पाहणी शिक्षण विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन करीत आहेत. ग्रामीण भागात चांगली उपस्थिती दिसून येत आहे. पालक सुध्दा  विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याविषयी सकारात्मक असल्याचे दिसत आहे. - राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी माध्यमिक

शहरात व तालुक्यात काेराेना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शाळेत पाठविणे धाेकादायक वाटत असले तरी शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, यासाठी पाल्याला शाळेत पाठविले जात आहे. काेराेनाचा संसर्ग हाेणार नाही, यासाठी शाळेने सुध्दा याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज  निर्माण झाली आहे.- दिनेश भांडेकर, पालक

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या