शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा घेऊन जाणारा ट्रक तलावात कोसळला

By admin | Updated: October 5, 2014 23:05 IST

छत्तीसगड राज्यामधून कुरखेडा फाटा ते वैरागड मार्गे गडचिरोलीवरून आंध्रप्रदेशाकडे दगडी कोळशाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक वैरागड-कढोली दरम्यान

वैरागड : छत्तीसगड राज्यामधून कुरखेडा फाटा ते वैरागड मार्गे गडचिरोलीवरून आंध्रप्रदेशाकडे दगडी कोळशाची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक वैरागड-कढोली दरम्यान असणाऱ्या पाटणवाडा गावालगतच्या तलावात कोसळल्याची घटना विजयादशमीच्या दिवशी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रक पूर्णत: क्षतीग्रस्त झाला असून ट्रकचालक किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.कुरखेडा फाटा ते वैरागड मार्ग अत्यंत अरूंद असल्यामुळे या मार्गावरून जड वाहनांची वाहतूक करणे धोक्याचे झाले आहे. या अरूंद मार्गावरून जड वाहनांची वाहतूक करू नये, असे परिवहन विभागाने अनेकदा सूचविले आहे. तसेच परिवहन विभाग कुरखेडा फाटा ते वैरागड मार्गे गडचिरोली या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक करण्यास परवानगी देत नाही. मात्र अनेक ट्रकचालक रात्रीच्या सुमारास शार्टकट मार्ग अवलंबित कुरखेडा फाटा ते वैरागड या मार्गावरूनच जड वाहने नेत असल्याचे दिसून येते. जड वाहनाच्या वाहतुकीमुळे या मार्गावर गेल्या दोन वर्षात अनेकदा अपघात घडले आहेत. गतवर्षी जडवाहनांच्या धडकेमुळे तीन तडसाचा मृत्यूही झाला होता. तसेच कढोली येथील दोघेजण याच मार्गावर गतवर्षी झालेल्या जड वाहनाच्या धडकेत दगावले. कुरखेडा फाटा ते वैरागड हा मार्ग अत्यंत अरूंद आहे. मात्र या मार्गाचे रूंदीकरण वाढविण्यात आले नाही. वैरागड-कुरखेडा मार्ग, आरमोरी व कुरखेडा या दोन्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येते. दोन विभागाच्या वादात या मार्गाची दुरूस्ती रखडली आहे. (वार्ताहर)