शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू निवडीसाठी एका सदस्याची निवड

By admin | Updated: June 4, 2015 01:35 IST

गोंडवाना विद्यापीठाच्या विद्वत्त व व्यवस्थापन समितीची संयुक्त बैठक बुधवारी गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात दुपारी पार पडली.

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या विद्वत्त व व्यवस्थापन समितीची संयुक्त बैठक बुधवारी गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात दुपारी पार पडली. या बैठकीला ५३ सदस्यांपैकी ३९ सदस्य उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेनंतर मागील चार वर्षे विद्यापीठाच्या व्यवस्थापन व विद्वत्त समित्या स्थापन करण्यात आल्या नव्हत्या. त्यानंतर मे महिन्यात या समित्यांचे गठण करण्यात आले. त्यानंतर बुधवारी या विद्वत्त व व्यवस्थापन समित्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यासह समितीचे ३९ सदस्य उपस्थित होते. गोंडवाना विद्यापीठाला सध्या प्रभारी कुलगुरू चांदेकरांच्या रूपाने मिळालेला आहे. नवीन कुलगुरू निवड प्रक्रियेला आजच्या या बैठकीत प्रारंभ करण्यात आला. नवीन कुलगुरू नियुक्तीसाठी तीन सदस्यीय समिती गठीत केल्या जाते. विद्यापीठाच्या प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत एका सदस्याचे नाव प्राधिकरणातर्फे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती आहे. या नावाबाबत विद्यापीठ प्रशासनाने कमालीची गोपनियता बाळगली असून कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडे संपर्क केला असता, त्यांनी एक सदस्याची निवड करण्यात आली, ऐवढीच माहिती दिली. त्या सदस्याचे नाव सांगण्यास त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना नकार दिला. प्राधिकरणाने एक सदस्य नियुक्त केला असल्यामुळे आता राज्यपालांचा प्रतिनिधी म्हणून एक व महाराष्ट्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून एक सदस्य नियुक्त केला जाईल. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू प्रक्रियेला प्रारंभ होईल. संयुक्त बैठकीत या विषयाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. दीड तास ही बैठक चालली, अशी माहिती मिळाली आहे. सकाळपासूनच विद्यापीठ प्रशासनाने या बैठकीबाबत प्रचंड गोपनियता बाळगलेली होती, हे विशेष.
प्राधिकरणाची संयुक्त बैठक असल्याने या बैठकीत विद्यापीठाच्या विविध अडचणी तसेच नवीन सत्रात सुरू होणारे अभ्यासक्रम आदीबाबत चर्चा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पहिली बैठक अवघ्या एक ते दीड तासात पार पडली. या बैठकीत एका सदस्याची निवड करण्याच्या पलीकडे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली नाही, अशी माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)