शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागातील भ्रष्टाचार प्रकरणांची चाैकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन हजार रुपयांची लाच घेताना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले हाेते. यावरून माध्यमिक शिक्षण विभागात भ्रष्टाचार हाेताे, हे उघड झाले आहे. या प्रकरणासह यापूर्वीच्या सर्व भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शालेय शिक्षणमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लाेंढे, संजय दाैरेवार, यादव बानबले, सुरेंद्र मामीडवार, मनाेज निंबार्ते, यशवंत रायपुरे, अनिल गांगरेड्डीवार, किरण धाेडरे आदी उपस्थित हाेते.

या निवेदनात शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या वेतन पथक कार्यालयातही भ्रष्टाचार होत आहे. वैयक्तिक मान्यता, वेतनेतर अनुदान, वैद्यकीय प्रतिपूर्ती, सेवानिवृत्तीचे प्रकरण, वेतन पथकातील देयके आदी हेतूपुरस्सरपणे प्रलंबित ठेवले जात असल्याचे संघटनेने म्हटले आहे.