शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास हाेऊ शकताे घरात कायमचा अंधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

आपल्या दैनंदिन गरजेसाठी वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे बिल भरणे अनिवार्य असताना वीज बिल चुकविण्यासाठी काही ग्राहक विद्युत मीटरमध्ये फेरफार करून वीज वितरण कंपनीची फसवणूक करतात; परंतु ही वीज चाेरी उघडकीस आल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या घरात कायमचा अंधार हाेऊ शकताे. एवढेच नाही तर तडजाेडी व दंडाची रक्कम अदा न केल्यास फाैजदारी कारवाईला सामाेरे जावे लागते.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आपल्या दैनंदिन गरजेसाठी वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक वीज युनिटचे बिल भरणे अनिवार्य असताना वीज बिल चुकविण्यासाठी काही ग्राहक विद्युत मीटरमध्ये फेरफार करून वीज वितरण कंपनीची फसवणूक करतात; परंतु ही वीज चाेरी उघडकीस आल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या घरात कायमचा अंधार हाेऊ शकताे. एवढेच नाही तर तडजाेडी व दंडाची रक्कम अदा न केल्यास फाैजदारी कारवाईला सामाेरे जावे लागते. गडचिराेली जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्याेगिक व कृषी ग्राहकांना वीज पुरवठा केला जाताे. वीज वापराच्या माेजमापासाठी ग्राहकांच्या घरात मीटर बसविले जाते. मीटर रीडिंगनुसार वीज बिलाची आकारणी केली जाते.

मीटर जप्ती व दंड

वीज चाेरी करणे कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या ग्राहकाकडे वीज चाेरी पकडली गेल्यास त्याने चुकविलेल्या वीज बिलाची रक्कम, दंड तसेच तडजाेडीची रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात येताे. हा दंड न भरल्यास कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई वीज वितरण कंपनीच्या वतीने केली जाते. विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून विजेची चाेरी केली जाते. मीटरमध्ये एक्स-रे पट्टी टाकून मीटर थांबविणे, रेजिस्टंट टाकणे, मीटर बायपास करणे आदी प्रकार हाेतात.

कधीही हाेऊ शकते मीटरची तपासणी- विद्युत चाेरीला आळा घालण्यासाठी महावितरणची पथके सदैव दक्ष असतात. एखाद्या ठिकाणी वीज चाेरी हाेत असल्याची शंका आल्यास किंवा काेणी गुप्त माहिती दिल्यास अथवा तक्रार केल्यास  ही पथके व्यक्ती, उद्याेग किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानांवर धाड टाकून विद्युत मीटरची तपासणी करतात.

वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या विरुद्ध कारवाई

महावितरणच्या चंद्रपूर व गडचिराेली मंडळातर्फे वीज चाेरीविरुद्ध विविध माेहिमा राबविण्यात आल्या. एप्रिल २०१७ ते ३० जून २०१८ या कालावधीत एकूण १ हजार ९४७ वीज चाेऱ्या पकडण्यात आल्या. गडचिराेली विभागात आकडे टाकून वीज चाेरीची १७६ प्रकरणे उघडकीस आली.- आनंद कुमरे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण.

 

टॅग्स :electricityवीज