शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जुन्याच समस्यांचे आव्हान

By admin | Updated: October 27, 2014 22:36 IST

जिल्ह्यात आकार व लोकसंख्येच्या दृष्टीने चामोर्शी सर्वात मोठा तालुका आहे. परंतु तालुक्याला विकासाची दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधी अद्यापही मिळाला नाही. जिल्हा निर्मितीनंतर गेल्या ३३ वर्षात

रत्नाकर बोमिडवार - चामोर्शीजिल्ह्यात आकार व लोकसंख्येच्या दृष्टीने चामोर्शी सर्वात मोठा तालुका आहे. परंतु तालुक्याला विकासाची दूरदृष्टी असलेल्या लोकप्रतिनिधी अद्यापही मिळाला नाही. जिल्हा निर्मितीनंतर गेल्या ३३ वर्षात या तालुक्याचा विकास फारशाप्रमाणात झाला नाही. अनेक मूलभूत समस्या अद्यापही डोके वर काढून आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासमोर जुन्याच समस्यांचे आव्हान उभे राहणार आहे.चामोर्शी तालुक्यात बारमाही वाहणारी वैनगंगा नदी व इतर उपनद्या आहेत. धानाचे उत्पादन घेण्यासाठी जिल्ह्यात सुपीक क्षेत्रही भरपूर प्रमाणात आहे. परंतु या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी अद्यापही फारशी प्रगती करू शकला नाही. शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही सिंचनाच्या सोयी पोहोचल्या नाहीत. विदर्भाचा खजुराहो व दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडेश्वराच्या विकासाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. पर्यटन व तीर्थस्थळ म्हणून मार्र्कंड्याचा विकास झाला नाही. त्यामुळे पर्यटन उद्योगाला अद्यापही चालना मिळाली नाही. धानक्षेत्र व पर्यटनाच्या भरवशावर या विभागाचा विकास होईल, अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करीत होते. परंतु सदर अपेक्षा फोल ठरली आहे. राईस मिल उद्योगाशिवाय तालुक्यात कुठल्याही उद्योगाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली नाही. बेरोजगारांच्या हाताला कामही नाही. धान उत्पादकांना अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर वारंवार आर्थिक संकट कोसळत आहेत. आरोग्य सेवेच्याबाबतीत नवनिर्वाचित आमदार स्वत: वैद्यकीय अधीक्षक राहिल्याने त्यांच्याच ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळणार काय, असाही प्रश्न आहे. चामोर्शी ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाल्याशिवाय आरोग्य सेवेत सुधारणा होणार नाही, अशी जनतेची भावना आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यातील अनेक गावात पाणीटंचाईचे भीषण सावट असते. अनेक किमी अंतरावरून महिलांना पिण्याचे पाणी आणावे लागते. त्याबरोबरच चामोर्शी शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने चामोर्शीत १३२ केव्हीचे पॉवर हाऊस निर्माण करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच फिडर, डीपी अनेक ठिकाणी उभारण्याची गरज आहे. चामोर्शी-आष्टी, चामोर्शी-मूल हे दोनही रस्ते दुरवस्थेत आहेत. वाहनधारकांची हाडे खिळखिळी होतील, अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे. याबरोबरच अनेक समस्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरूस्तीचेही नवीन आमदारांसमोर आव्हान आहे.