शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दलालास तहसीलदाराची चपराक

By admin | Updated: October 27, 2014 22:35 IST

स्थानिक तहसिल कार्र्यालयात रेशन कार्डची दुयम प्रत बनवितांना कार्यालयातील दलालास नायब तहसिलदारांनी रंगेहात पकडल्याने दलालाचे बिंग फुटले.

देसाईगंज : स्थानिक तहसिल कार्र्यालयात रेशन कार्डची दुयम प्रत बनवितांना कार्यालयातील दलालास नायब तहसिलदारांनी रंगेहात पकडल्याने दलालाचे बिंग फुटले. रेशन कार्डासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या नागरीकास रेशनकार्ड सहज उपलब्ध होऊ शकत नाही़ मात्र तहसिल कार्यालयात दलालामार्फत रेशन तयार करण्याच्या प्रकरणामुळे तहसील कार्यालयाच्या प्रशासनावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक तहसिल कार्यालयात नवीन रेशन कार्ड बनविण्याच्या कामात टाळाटाळ करण्यात येत हाती़ मात्र रेशन कार्डची दुयम प्रत बनविण्यासाठी लाभार्थ्यांची चांगलीच गर्दी सदर कार्यालयात दिसून येत होती़ संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याने कमीशनच्या लालसे पोटी रेशन कार्डाची दुय्यम प्रत बनविण्यासाठी दलालाचा आधार घेत सर्व नियम धाब्यावर बसवून तहसीलदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले कोरे रेशन कार्डच दलालाच्या हवाली करून लाभार्र्थ्याकडून मनमानी रक्कम लुटण्याचा प्रकार सदर दलाल करीत असल्याच्या नागरिकाकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ मात्र याची साधी माहितीही तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना नसल्याने असे प्रकार सर्रास तहसील कार्यालयात सुुरू होते़. परंतू आज सोमवारी एका सुज्ञ नागरीकाच्या सतर्कतेने सदर प्र्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे साटेलोटे असलेल्या सबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे़ सर्वसामान्य नागरिकास तहसील कार्यालयातून रेशन कार्ड बनविणे म्हणजे तारेवरची कसरतच असते़ रेशनकार्र्ड बनविण्यात होत असलेल्या त्रासापायी कित्येक नागरीकांनी रेशन कार्ड तयार करण्याचे कार्यच मनातून काढून टाकले़ तहसील कार्यालयातून कार्ड तयार होऊ शकत नसल्याचे सांगुन कित्येकाना बाहेरचा रस्ता दाखविल्या जात आहे़ मात्र दलालामार्फत छुप्यामार्गाने कोणत्याही त्रासाविणा तहसील कार्यालयाच्या वरांडयातूनच रेशन कार्ड तयार करण्याचा गोेरखधंदा दलालानी गेल्या अनेक दिवसांपासून चालविला आहे. अशाच प्रकारचा रेशनकार्ड बनविताना नायब तहसिलदार ए़ बी़ मडावी व धाईत यांनी संबंधित दलालास रंगेहात पकडले़ कार्यालयाच्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालयाच्या प्रशासनात प्रचंड खळबळ माजली आहे. (वार्ताहर)