शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५६२ काेटींच्या ८ रस्त्यांना केंद्र सरकारची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

गडचिराेली- चिमूर लाेकसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या प्रमुख आठ मार्गांच्या रुंदीकरण व दुरुस्तीसाठी केंद्र शासनाच्या रस्ते व परिवहन मंत्रालयाने सुमारे ५६२ काेटी ८४ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, अशी माहिती खा. अशाेक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या आठ मार्गांमध्ये रेपनपल्ली-सिराेंचा या ५९ किमीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यासाठी २८२ काेटी रूपये मंजूर केले आहेत.

ठळक मुद्देखासदारांची माहिती : केंद्रीय रस्ते परिवहन विभागाचा निधी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली- चिमूर लाेकसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या प्रमुख आठ मार्गांच्या रुंदीकरण व दुरुस्तीसाठी केंद्र शासनाच्या रस्ते व परिवहन मंत्रालयाने सुमारे ५६२ काेटी ८४ लाख रुपये मंजूर केले आहेत. यासाठी आपण शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, अशी माहिती खा. अशाेक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या आठ मार्गांमध्ये रेपनपल्ली-सिराेंचा या ५९ किमीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यासाठी २८२ काेटी रूपये मंजूर केले आहेत. तसेच चिचगड ते काेरची या दरम्यानच्या २२ कि.मी. मार्गासाठी १२ काेटी ७८ लाख, काेरची-कुरखेडा-ब्रम्हपुरी दरम्यानच्या पाच कि.मी. मार्गाच्या मजबुतीकरणासाठी १९.१३ काेटी, मानपूर छत्तीसगड बाॅर्डर ते धानाेरादरम्यानच्या ८ किमी मार्गासाठी ६.९६ काेटी, चाैडमपल्ली ते गुड्डीगुडम या  २४ किमीसाठी ८३.७३ काेटी, गुड्डीगुडम ते गाेविंदपूर या २४ किमीसाठी ८१.२१ काेटी, धानाेरा तालुक्यातील छत्तीसगड बाॅर्डर ते गडचिराेली दरम्यानच्या १२ किमी मार्गासाठी ३४.०३ काेटी, आलापल्ली-भामरागड-लाहेरी-बिनागुडा मार्गादरम्यानच्या आठ किमी मार्गासाठी ४३ काेटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती खा. अशाेक नेते यांनी दिली.  पत्रकार परिषदेला नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमाेद पिपरे, सुधाकर येनगंधलवार, संजय बारापात्रे, डाॅ. भारत खटी, प्रणय खुणे उपस्थित हाेते. या कामांना लवरकच सुरूवात हाेईल, असा विश्वास खासदार अशाेक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केला.

प्रत्येकाने लस घ्यावीकाेराेना प्रतिबंधात्मक लस अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी. केंद्र शासनाने काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्याची जबाबदारी राज्य शासनावर साेपविली आहे. मात्र राज्य शासनाने याेग्य त्या उपाययाेजना वेळीच न केल्याने राज्यात व जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. काही विराेधक काेराेना प्रतिबंधात्मक लसबाबत अपप्रचार करीत आहेत. मात्र त्याला बळी न पडता प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी, असे आवाहन खा. अशाेक नेते यांनी केले.

 

टॅग्स :highwayमहामार्ग