शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या विमुक्त जमातींची जनगणना करा

By admin | Updated: April 27, 2016 01:27 IST

राज्यभरातील भटक्या विमुक्त जमातींची जनगणना करून या समाजातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या,

चामोर्शी : राज्यभरातील भटक्या विमुक्त जमातींची जनगणना करून या समाजातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या, अन्यथा राज्यभरात आंदोलन तीव्र केला जाईल, असा इशारा भटके विमुक्त परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चामोर्शी येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान दिला आहे. भटक्या विमुक्त जमातीच्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत घालून त्यांना वसतिगृहाची सुविधा निर्माण करून द्यावी, बेरोजगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मदत करण्यात यावी, जनावरांना चराईसाठी राखीव कुरण ठेवावे, कैकाडी समाजाला बीपीएल व आधारकार्ड सुविधा उपलब्ध करून द्याव्या, चामोर्शी तालुक्यातील मच्छीमारांसाठी जागा राखीव ठेवाव्या, नॉन क्रिमिलिअरची अट रद्द करावी आदी मागण्यांसाठी शासनाकडे लढा सुरू असल्याचे पत्रकार परिषदेरम्यान सांगितले. यापुढे प्रत्येक गावात संघर्षवाहिनीची शाखा स्थापन केली जाईल व समाजात जनजागृती केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ११ टक्के स्वंतत्र आरक्षण देण्यात यावे, या समाजासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन कर्ज उपलब्ध करून द्यावे, मच्छीमारांच्या संस्थांना संरक्षण द्यावे, घरकूल योजनेपासून वंचित राहिलेल्या समाजातील युवकांना घरकूल उपलब्ध करून द्यावे, वनहक्क कायद्याअंतर्गत मासेमारीचे हक्क मच्छीमार समाजाला द्यावे, पट्ट्यांचे वाटप करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन तीव्र्र करण्याचा इशारा पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आला.पत्रकार परिषदेला सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी पी. जे. सातार, मनमोहन बंडावार, हरीश गेडाम, प्रमोद एडलावार, मारोती आग्रे, सुरेश गुंतीवार, किरण आकुलवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)