शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

गावातून होणार सिमेंट काँक्रिट रोड

By admin | Updated: October 26, 2016 01:35 IST

मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामाला प्रत्यक्ष यावर्षीपासून सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण

मुख्यमंत्री सडक योजनेतून चेहरा बदलणार : जिल्ह्यात यावर्षी ७७ किमीच्या रस्त्यांना प्रशासकीय मान्यतागडचिरोली : मुख्यमंत्री सडक योजनेच्या कामाला प्रत्यक्ष यावर्षीपासून सुरुवात होणार आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील रस्ते बांधण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. मुख्यमंत्री सडक योजनेचा एखादा रस्ता गावातून जात असल्यास तो रस्ता सिमेंट काँक्रिटचा बनविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यात मागील वर्षीपासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. सदर योजना पुढील पाच वर्षापर्यंत राबविण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात किमी किमीचे रस्ते बांधायचे याचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र ग्रामसडक योजनेंतर्गत मुख्यत्वेकरून ग्रामीण व दुर्गम भागातच रस्ते बांधले जातात. गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा एखादा रस्ता गावातून जात असल्यास सदर रस्ता सुद्धा काँक्रिटीकरणाचाच करण्यात यावा, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत प्रामुख्याने खडीकरणाचे किंवा डांबरी रस्ते बांधले जातात. गावातून खडीकरण झाल्यास सदर रस्ता एका वर्षातच उखडून जाण्याची शक्यता राहते. त्यानंतर ग्रामपंचायतीला आणखी सिमेंट काँक्रिटीकरण करावे लागते. हा दुबार खर्च टाळण्याच्या उद्देशाने शासनाने सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते गावातून बांधण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नियोजन करून मुख्यमंत्री सडक योजना विभागाने रस्त्यांच्या कामांचे टेंडर काढले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये नियोजन करण्यात आलेले रस्ते बांधकामाला यावर्षीपासून सुरुवात होणार आहे. सुमारे ७७ किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. तर २०१६-१७ मधील टप्पा एकमध्ये ७५ किमीचे रस्ते बांधले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भाग अधिक आहे. बहुतांश रस्ते गावातूनच जात असल्याने शासनाच्या नवीन निर्णयाचा लाभ होणार आहे. त्यामुळे शासनाच्या या नवीन निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. (नगर प्रतिनिधी)