अहेरी राजवाड्यात महात्मा फुले यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST2021-04-13T04:34:40+5:302021-04-13T04:34:40+5:30

या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, युवानेते ऋतुराज हलगेकर, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव आत्राम उपस्थित होते. ...

Celebration of Mahatma Phule's birthday at Aheri Palace | अहेरी राजवाड्यात महात्मा फुले यांची जयंती साजरी

अहेरी राजवाड्यात महात्मा फुले यांची जयंती साजरी

या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, युवानेते ऋतुराज हलगेकर, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव आत्राम उपस्थित होते. याप्रसंगी आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी, महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य अतुलनीय कार्य असून फुले दाम्पत्य मानव कल्याणासाठी झटले असून शिक्षण व प्रामुख्याने स्त्री शिक्षणासाठी एकाकी लढा दिला. तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटले. फुले दाम्पत्याचे संघर्षमय जीवन प्रत्येकाने आत्मसात करून त्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. या वेळी श्रीनिवास वीरगोनवार, सारिका गडपल्लीवार, शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोने, महेश मोहुर्ले, इरफान पठाण, मखमूर शेख, राजू पडालवार उपस्थित होते.

===Photopath===

120421\12gad_5_12042021_30.jpg

===Caption===

कार्यक्रमाला उपस्थित आमदार धर्मरावबाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम व अन्य.

Web Title: Celebration of Mahatma Phule's birthday at Aheri Palace