शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडात गांजाची शेती उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST

तीनही आरोपींविरूद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस)१९८५ चे कलम ८(क)(२०) ब, क, २२(क) अन्वये ...

तीनही आरोपींविरूद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस)१९८५ चे कलम ८(क)(२०) ब, क, २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी कुरखेडाचे न्यायालय कोरचीत जात असल्यामुळे सदर आरोपींना कोरचीला नेऊन न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यात तिघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

ही कारवाई ठाणेदार सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, हवालदार बळीराम पदा, मनोहर पुराम, मानकर, बारसागडे, पोलीस शिपाई ललीत जांभूळकर, लोमेश मेश्राम, महिला शिपाई अश्विनी रामटेके आदींनी केली.

अलिकडची पहिलीच कारवाई

जिल्ह्याच्या काही भागात छुप्या मार्गाने तेलंगणाकडून गांजा येतो, पण जिल्ह्यात गांजाची शेती करण्याची हिंमत अलिकडे कोणी केलेली नव्हती. त्यामुळे अशा पद्धतीने शेतातून हिरवा गांजा जप्त करण्याची ही अलिकडच्या काही वर्षातील पहिलीच कारवाई ठरली आहे. हा गांजा नेमका कोणाला विक्री केला जात होता, त्यांचे जाळे कुठे-कुठे पसरले आहे हे पुढील तपासात निष्पन्न होऊ शकेल.कुरखेडा : येथून वाकडी मार्गावरील एका शेतात चक्क गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्या शेतात छापा मारून केलेल्या कारवाईत तब्बल ५२ किलो ९०० ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत २ लाख ६५ हजार रुपये आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. सदर कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली.

कुरखेडापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी शेतशिवारात प्रतिबंधित असलेल्या गांजा या अमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती कुरखेडाचे ठाणेदार सुधाकर देठे यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेखर आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात छापा मारण्यात आला. यावेळी कुंडलिक मुंगसू कसारे (६५) रा.आझाद वाॅर्ड, कुरखेडा यांच्या शेतात हिरवट आणि उग्र वास येणाऱ्या गांजा या वनस्पतीची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केली असल्याचे दिसून आले. याचवेळी तो गांजा विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी आलेले सौरव संतोष डहाळे (२०) आणि रितिक राधेश्याम मच्छिरके (रा.चिखली, ता.कुरखेडा) हे सुद्धा तिथे होते. या तिन्ही आरोपींकडून ५२ किलो ९०० ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आला. त्याची बाजारभावानुसार किंमत २ लाख ६४ हजार ५०० रुपये आहे. तसेच आरोपीकडील एक दुचाकी (किंमत २५ हजार) जप्त करण्यात आली.

तीनही आरोपींविरूद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस)१९८५ चे कलम ८(क)(२०) ब, क, २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी कुरखेडाचे न्यायालय कोरचीत जात असल्यामुळे सदर आरोपींना कोरचीला नेऊन न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यात तिघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

ही कारवाई ठाणेदार सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, हवालदार बळीराम पदा, मनोहर पुराम, मानकर, बारसागडे, पोलीस शिपाई ललित जांभूळकर, लोमेश मेश्राम, महिला शिपाई अश्विनी रामटेके आदींनी केली.

अलिकडची पहिलीच कारवाई

जिल्ह्याच्या काही भागात छुप्या मार्गाने तेलंगणाकडून गांजा येतो, पण जिल्ह्यात गांजाची शेती करण्याची हिंमत अलिकडे कोणी केलेली नव्हती. त्यामुळे अशा पद्धतीने शेतातून हिरवा गांजा जप्त करण्याची ही अलिकडच्या काही वर्षातील पहिलीच कारवाई ठरली आहे. हा गांजा नेमका कोणाला विक्री केला जात होता, त्यांचे जाळे कुठे-कुठे पसरले आहे हे पुढील तपासात निष्पन्न होऊ शकेल.