एटापल्ली व घोट येथे अंंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:34 IST2021-04-12T04:34:32+5:302021-04-12T04:34:32+5:30

चामोर्शी तालुक्यातील घोट येथे महाराष्ट्र अंनिसचे घोट शाखेचे अध्यक्ष चोपाराम काशीराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. सत्र ...

Branch of Anti-Superstition Committee formed at Etapalli and Ghot | एटापल्ली व घोट येथे अंंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा गठित

एटापल्ली व घोट येथे अंंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा गठित

चामोर्शी तालुक्यातील घोट येथे महाराष्ट्र अंनिसचे घोट शाखेचे अध्यक्ष चोपाराम काशीराम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. सत्र २०२१-२२ करिता अंनिसच्या घोट शाखेची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून चोपाराम कांबळे, उपाध्यक्ष पी.डी. कोवाची, उपाध्यक्षपदी मुरलीधर नागोसे, कार्याध्यक्ष आशिफ शौकत अली सय्यद, प्रधान सचिव प्रदीप चहानकर, विविध उपक्रम कार्यवाह बंडू दुधबावरे, कोषाध्यक्ष कैलाश जुआरे, महिला सहभाग कार्यवाह मुमताज आशिफ सय्यद, महिला सहभाग सहकार्यवाह विजय अगडे, सदस्य म्हणून साेनाली ऊईके, राकेश वासनिक, गैर पंचानंद शहा, भूषण चंदनखेडे, गजानन सादुलवार आदींचा समावेश आहे. कार्यकारिणी गठित झाल्याबद्दल जिल्हा शाखेचे अध्यक्ष उद्धव डांगे, उपाध्यक्ष शब्बीर शेख, उपाध्यक्ष ग्रीष्मा मून, कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, प्रधान सचिव पुरुषोत्तम ठाकरे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव कोठारे यांनी काैतुक केले.

Web Title: Branch of Anti-Superstition Committee formed at Etapalli and Ghot