गानली समाजाच्या सभेत विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:36+5:302021-02-05T08:48:36+5:30

अहेरी : येथे गानली समाज संघटनेची बैठक रविवारी पार पडली. या सभेत समाजाचे कुलदैवत श्री मार्तंड खंडोबा (मल्हारी मलन्ना) ...

Brainstorming at the Ganli community meeting | गानली समाजाच्या सभेत विचारमंथन

गानली समाजाच्या सभेत विचारमंथन

अहेरी : येथे गानली समाज संघटनेची बैठक रविवारी पार पडली. या सभेत समाजाचे कुलदैवत श्री मार्तंड खंडोबा (मल्हारी मलन्ना) यांचे मंदिर तसेच समाजभवन उभारण्याचा संकल्प करुन विविध विषयांवर चर्चा केली. अध्यक्षस्थानी गानली समाजाचे व्येकंटेश बोम्मावार होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, गानली समाज संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास गद्देवार उपस्थित होते.

या महाचर्चेत अहेरी उपविभागातील संपूर्ण गानली समाज बांधव सहभागी झाले. मार्तंड खंडाेबा मंदिर निर्माण तथा समाजभवन उभारणीत सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी रवींद्र बोम्मावार, लक्ष्मण गद्देवार, जुगल बोमनवार, अमित येणप्रेड्डीवार, पद्मा येनगंटीवार यांनी विचार व्यक्त करीत समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा मनाेदय व्यक्त केला. बैठकीचे संचालन निखिल बोम्मावार, प्रास्ताविक श्रीकांत गद्देवार तर आभार महेश गद्देवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी नरेश बोम्मावार, नीलेश पुपरेड्डीवार, अमित नागुलवार, दिनेश येनगंटीवार, मलरेड्डी ओडेट्टीवार,पराग आईलवार, नितिन बंडमवार, सचिन नागुलवार, आकाश बोमनवार, नरेंद्र बोम्मावार, वैभव कंकडालवार, प्रवीण आईलवार, अविनाश बोमनवार, संतोष येनगंटीवार, मलरेड्डी बोमनवार, फ्रफुल येनगंटीवार, मुकेश पुपरेड्डीवार, तिरुपती सल्लावार, साई येनगंटीवार, राजू तोटावार, अक्षीत पोरेड्डीवार, प्रमोद गोडशेलवार तसेच समाजबांधवांनी सहकार्य केले.

Web Title: Brainstorming at the Ganli community meeting