शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात विचारमंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST

गडचिराेली : शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृह चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा मेळावा शुक्रवारी स्थानिक पत्रकार भवनात पार पडला. या मेळाव्यात ...

गडचिराेली : शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृह चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचा मेळावा शुक्रवारी स्थानिक पत्रकार भवनात पार पडला. या मेळाव्यात विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कार्तिकस्वामी काेवे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रकल्प अध्यक्ष संताेष धाेटे, भामरागड प्रकल्प अध्यक्ष युवराज कुमरे, भजन किरंगे, भाऊराव गाेडघाडे उपस्थित हाेते. मेळाव्यात संघटनेचे महत्त्व, समस्या यासह विविध बाबींवर संताेष धाेटे यांनी मार्गदर्शन केले. नाेकर कपात, धाेरणात्मक निर्णय, सेंट्रल किचन याविषयी प्रा. रमेशचंद्र धाेटे यांनी मार्गदर्शन केले. कार्तिकस्वामी काेवे यांनी संघटना मजबूत करण्यााबाबत काय कार्यक्रम व उपक्रम राबविता येईल याविषयी सांगितले. दरम्यान चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन लालाजी मडावी तर आभार लाेमेश लाेंढे यांनी मानले.

यशस्वीतेसाठी गुरुदेव मडावी, लता काेडाप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बाॅक्स...

प्रकल्प कार्यकारिणी गठित

मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात चतुर्थ श्रेणी कर्मचारी गडचिराेली प्रकल्पाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. चित्रकुट काेवे यांची गडचिराेली प्रकल्प अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी लालाजी मडावी, सचिवपदी लाेंढे तर सदस्यपदी वंदना गेडाम, वृंदा वड्डे, सुनिता आत्राम, ए.जे. इन्कने, युवराज झंझाळ, सुधीर दिकाेंडावार, अमर लाटेलवार, गणेश दुर्कीवार व इतर कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली.