शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बदली प्रकरणाचा तपासी अधिकारी बदलला

By admin | Updated: September 10, 2016 01:10 IST

बोगस शिक्षक बदली प्रकरणाचा तपास पीएसआय मुनगेलवार यांच्याकडून काढून टाकण्यात आला असून सदर तपास गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पुराणिक

गडचिरोलीच्या ठाणेदारांकडे सूत्र : ‘त्या’ दोन मास्टर मार्इंड कर्मचाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरूगडचिरोली : बोगस शिक्षक बदली प्रकरणाचा तपास पीएसआय मुनगेलवार यांच्याकडून काढून टाकण्यात आला असून सदर तपास गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पुराणिक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील खरे सूत्रधार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू झाला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या २०१३ साली करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी तब्बल तीन वर्षानंतर जिल्हा परिषदेतील लिपीक रूपेश शेडमाके याला अटक केली. सध्या रूपेश शेडमाके हा न्यायालयीन कोठडीची हवा खात आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान या प्रकरणात त्यावेळी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांची नावे सांगितली आहेत. या प्रकरणात गुंतून असलेल्या शिक्षकांनी सुध्दा याच दोघांची नावे सांगितले आहेत. सदर बोगस प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्या इतर तालुक्यामध्ये करण्यात आल्या होत्या. रूपेश शेडमाके याने आपले नाव तपासामध्ये सांगितले असल्याची कुणकुण माहित होताच हे दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणात हे दोघेच खरे मास्टर मार्इंड आहेत. रूपेश शेडमाकेच्या जबाबावरून पोलिसांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास बजाविले होते. मात्र आरोपी त्यापूर्वीच फरार झाले आहेत. मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पोलीस संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत या दोन कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाही. शिक्षक बोगस बदली प्रकरणातील हे दोघेच व्यक्ती खरे सूत्रधार असल्याने त्यांच्या अटकेनंतर बरीच माहिती समोर येणार आहे. सदर दोन कर्मचारी आणखी इतरही व्यक्तींची नावे सांगणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. (नगर प्रतिनिधी)