शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सत्तेची मोठी मोट बांधण्याच्या तयारीत

By admin | Updated: March 21, 2017 00:44 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ मार्च रोजी होऊ घातली आहे.

बहुमताचे संख्याबळ ३४ पर्यंत वाढण्याची शक्यतागडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक २१ मार्च रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अपक्षांची आघाडी झाली आहे. या आघाडीत आणखी आदिवासी विद्यार्थी संघालाही स्थान देण्याबाबत सोमवारी रात्री उशीरापर्यंत नागपुरात भाजप नेत्यांचे खलबत्ते सुरू होते. काँग्रेस वगळता सर्वांनाच सोबत घेऊन बहुमताचे संख्याबळ ३४ पर्यंत नेण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार असल्याचे हालचालीवरून दिसून येत आहे. सोमवारी भाजपसह मित्र पक्षांच्या सर्व सदस्य व नेत्यांची नागपुरात बैठक झाली. ही बैठक बऱ्याच उशीरापर्यंत सुरू होती. या बैठकीत पूर्वी ठरल्यानुसार भाजप, राष्ट्रवादी व एक अपक्ष असे २६ चे संख्या बळ निश्चित होते. यात आणखी एका सदस्याची भर पडल्याची माहिती आहे. त्यामुळे हे संख्याबळ आता २७ वर पोहोचले आहे. याशिवाय रात्री उशीरापर्यंत आविसंला आपल्या सोबत घेण्याबाबत भाजपचे अनेक नेते आग्रही होते. पुढील दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन अहेरी विधानसभा क्षेत्रात आविसं आपल्या सोबत असायला हवा, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या नागपूर स्थित पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे या नव्या मित्रावर व्यापक प्रमाणात चर्चा भाजपच्या गोटात सुरू होती. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने आविसंही सोबत येऊ शकतो, असे सूचक उद्गार लोकमतशी बोलताना काढले. जिल्हा परिषदेत भाजपला २०, काँग्रेसला १५, आदिवासी विद्यार्थी संघाला सात, राष्ट्रवादी काँग्रेसला पाच, ग्रामसभांना दोन व दोन जागा रासपला मिळाल्या आहे. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने बहुमताच्या २६ संख्याबळापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची जोरदार तयारी चालली आहे. त्यामुळे भाजपचाच अध्यक्ष गडचिरोली जिल्हा परिषदेवर विराजमान होणार हे निश्चित असले तरी सोमवारच्या दिवसभराच्या हालचालीवरून उपाध्यक्ष पद कुणाच्या पदरात पडते हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नव्हते. आदिवासी विद्यार्थी संघ सोबत आल्यास त्यांना काय पद दिले जातात. या साऱ्या बाबी गुलदस्त्यातच होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष सभागृहात भाजपचा बहुमताचा आकडा कितीपर्यंत पोहोचतो. हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)