शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कार्यालयांसमाेर भाजपची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST

गडचिराेली : काेराेनाकाळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले हाेते, मात्र वीजबिल माफ केले नाही. तसेच महावितरणतर्फे थकीत ...

गडचिराेली : काेराेनाकाळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले हाेते, मात्र वीजबिल माफ केले नाही. तसेच महावितरणतर्फे थकीत ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला जात आहे. याविराेधात जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयांसमाेर भाजप पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. तर काही कार्यालयांना कुलूपही ठाेकण्यात आले. तसेच वीज विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

गडचिराेली येथील इंदिरा गांधी चाैकात हल्लाबाेल आंदाेलन करण्यात आले. तसेच महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठाेकण्यात आले. यावेळी आ. डाॅ. देवराव होळी, नगराध्यक्ष याेगीता पिपरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, नगरसेवक रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, युवामोर्चा महामंत्री मधुकर भांडेकर, महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, न.प. बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, विलास भांडेकर, नगरसेवक अल्का पोहनकर, लता लाटकर, देवाजी लाटकर, नीता उंदीरवाडे, श्यामराव वाढई, नरेश हजारे, सिद्धार्थ नंदेश्वर, राजू शेरकी, मोरेश्वर भांडेकर, जनार्दन भांडेकर, नरेंद्र भांडेकर, राकेश राचमलवर, जावेद अली, विठोबा झरकर आदी उपस्थित हाेते.

चामाेर्शी: चामाेर्शी येथील महावितरणच्या कार्यालयास आ. डाॅ. देवराव हाेळी यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. कार्यालयाला कुलूप ठाेकून सरकार व महावितरणच्या विराेधात निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रा. रमेश बारसागडे , भाजप पंचायत समिती सभापती भाऊराव डोर्लीकर, जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, नगरपंचायतचे गटनेते प्रशांत येगलोपवार, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशिष पिपरे, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, विनोद गौरकर, राजू चुधरी, संजय खेडेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रतीक राठी, युवा नेते वासुदेव चिचघरे, रामचंद्र वरवाडे, राजू झाडे, मुन्ना गटलेवार, ज्येष्ठ नेते जयराम चलाख आदी उपस्थित हाेते.