शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार

By admin | Updated: June 4, 2015 01:32 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या शासकीय सेवेतील राजीनाम्याच्या मुद्यावरून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

नागपूर खंडपीठ : १० जूनला न्यायालयात उत्तर देण्याची अंतिम संधी
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या शासकीय सेवेतील राजीनाम्याच्या मुद्यावरून त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. या संदर्भात अपक्ष उमेदवार नारायणराव दिनबाजी जांभुळे यांनी २ डिसेंबर २०१४ ला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात डॉ. देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दोनवेळा आपली बाजू मांडण्यासाठी डॉ. देवराव होळी यांना संधी देण्यात आली होती. मात्र त्यांनी न्यायालयात या संदर्भात बाजू मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. न्यायालयाने त्यांना १० जून पर्यंत उत्तर दाखल करण्यासाठी अंतिम तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत जर आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडून उत्तर दाखल झाले नाही तर न्यायालय आपला निर्णय देऊ शकते, असे ज्येष्ठ विधीज्ञांचे म्हणणे आहे.
आमदार होण्यापूर्वी डॉ. देवराव होळी हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला, परंतु तो मंजूर झाला नाही. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे, ते सरकारी सेवेत असताना त्यांनी शकुंतला मेमोरीअल सोसायटी धर्मदाय या संस्थेचे अध्यक्ष पदही भुषविले व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या कार्यक्रमात घोटाळा या संस्थेने केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गडचिरोली जिल्हा न्यायालयात खटला सुरू आहे. यात ८ लाख ६७ हजार ३६३ रूपयांची रिकव्हरी निघालेली आहे. डॉ. होळी हे विधानसभेवर निवडून आल्यानंतर या मतदार संघातून निवडणूक लढलेले उमेदवार नारायण जांभुळे यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. यादरम्यान डॉ. होळी यांनी आपला राजीनामा नामंजूर करण्याच्या प्रशासकीय आदेशा विरोधात मॅटमध्येही आव्हान दिले आहे. मॅटने २८ आॅक्टोबर २०१४ ला त्यांची याचिका खारीज करून प्रशासनाने राजीनामा नामंजूर करण्याचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यालाही फेब्रुवारी २०१५ मध्ये हायकोर्टात डॉ. होळी यांनी आव्हान दिले आहे. एकूणच न्यायालयीन प्रक्रियेत होळी यांच्या आमदारकीवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. (जिल्हा प्रतिनिधी)