धानाेरा-चव्हेला मार्गाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:05+5:302021-02-05T08:48:05+5:30

धानाेरा : धानोरा-चव्हेला रस्ता बांधकामाचे भूमिपूजन खा. अशाेक नेते यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...

Bhumi Pujan of Dhanera-Chavela road | धानाेरा-चव्हेला मार्गाचे भूमिपूजन

धानाेरा-चव्हेला मार्गाचे भूमिपूजन

धानाेरा : धानोरा-चव्हेला रस्ता बांधकामाचे भूमिपूजन खा. अशाेक नेते यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. धानोरा ते चव्हेला हा ८ किमीचा मार्ग आहे. या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. येथून नागरिक, शालेय विद्यार्थी प्रवास करतात. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे आरसीपीएलडब्लूई अंतर्गत मार्गाचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. भूमिपूजनप्रसंगी माजी नगराध्यक्ष लीना साळवे, रेखा डोळस, ताराबाई कोटांगले, साईनाथ साळवे, कैलाश गुंडावार, अनंत साळवे, बाळू उंदीरवाडे, महादेव गणोरकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शालिक उसेंडी, उपविभागीय अभियंता डी. एस. बड्डे, सुभाष धाईत, सारंग साळवे, विनोद निंबोरकर, विजय कुमरे, जावेद अली, दिलीप गावळे उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of Dhanera-Chavela road