शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टमध्ये होणार रेल्वेमार्गाचे भूमिपूजन

By admin | Updated: May 6, 2016 01:12 IST

आॅगस्ट २०१६ मध्ये वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार अशोक नेते यांना दिली आहे.

खासदारांची रेल्वे मंत्र्यांशी दिल्लीत बैठक : वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाला केंद्र सरकार प्राधान्य देणारगडचिरोली : आॅगस्ट २०१६ मध्ये वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार अशोक नेते यांना दिली आहे. गुरूवारी खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली, त्यावेळी वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासंदर्भात दीर्घ चर्चा झाली. नामदार प्रभू यांनी तत्काळ कार्यकारी संचालक (बांधकाम) मोहित मिश्रा व कार्यकारी संचालक (आरआरबी) यांना सविस्तर माहिती देऊन निवेदन देण्याचे निर्देश दिले. वडसा-गडचिरोली रेल्वेलाईन व छत्तीसगडमधील रेल्वे प्रकल्प हे केंद्र सरकारच्या शिर्षस्थ स्थानी असून त्यांची कामे प्रगतीपथावर आहे. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचा प्रकल्प हा नक्षलग्रस्त भागातील असल्याने केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाकडे भागिदारीसाठी मागणी करण्यात आली होती. हा प्रश्न केवळ आर्थिक भागिदारीचा नाही. गृहमंत्रालय अशा प्रकारच्या प्रकल्पामध्ये सहभागी होत नाही. त्यांचे कार्य सुरक्षा देण्यापर्यंत मर्यादित असल्याचे कार्यकारी संचालकांनी या बैठकीदरम्यान खासदार अशोक नेते यांच्याकडे स्पष्ट केले. मागील १५ वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित असून येत्या आॅगस्ट महिन्यात या प्रकल्पाचे भूमीपूजन केले जाईल, असेही ठोस आश्वासन सुरेश प्रभू यांनी खासदार नेते यांना दिले. तसेच गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून जाणारा नागभिड-नागपूर नॅरोगेज ब्रॉडगेजमध्ये रूपांतरीत करण्याला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. २३ एप्रिल २०१६ रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत या मार्गाच्या बांधकामासाठी निधी खर्च करण्याला निधी आयोगाची मंजुरी नसल्याने काम अजुनही सुरू झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात २५ कोटी रूपयांची तरतूद या मार्गासाठी करण्यात आली. निधी आयोगाने तत्काळ मंजुरी दिल्यास या मार्गाचेही काम सुरू करू, असे आश्वासन सुरेश प्रभू यांनी खासदार नेते यांना दिले. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचा प्रस्ताव गृहमंत्रालयाने फेटाळल्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर खासदार नेते यांनी रेल्वेमंत्र्यांची तत्काळ भेट घेतली.