शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
5
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
6
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
7
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
8
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
9
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
10
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
11
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
12
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
13
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
14
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
16
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
17
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
18
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
20
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी झाली कसरत

By admin | Updated: June 26, 2015 00:13 IST

मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील विद्युत पुरवठा पूर्णत: खंडीत झाला होता.

भामरागड : मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील दुर्गम भागातील विद्युत पुरवठा पूर्णत: खंडीत झाला होता. परंतु विद्युत कर्मचाऱ्यांनी सतत चार दिवस केलेल्या परिश्रमामुळे वीज पुरवठा २४ जून रोजी सुरळीत करण्यात झाला. कांदोळी, गोफनफुली, तुरमगुंडा, उदेडा परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
भामरागड तालुक्यात २० जून पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पाच दिवस कहर केला. तीन दिवसांत जवळपास ४७ मिली पाऊस झाला. एटापल्ली व भामरागड तालुक्यातून वाहणाऱ्या बांडिया नदीला पूर आल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. कांदोळी गावात वीज तारांवर चार झाडे पडली होती. तर भामरागड परिसरातील गोफनफुली गावात वीज तारांवर दोन झाडे पडली होती. तारांवर पडलेली संपूर्ण सहाही झाडे कापून वीज तारा मोकळ्या करण्यात आल्या. आपत्कालीन योजना म्हणून पडलेले खांब बायपास करून वीज तारांना ताणण्यात आले. तुमरगुंडा व उदेडा गावाजवळ वीज पडल्याने ७ पीन इंसुलेटर्सचे तुकडे झाले होते. विद्युत कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर तुकडे शोधून ते बदलविण्यात आले. लाईनमन मंगाम व कंत्राटी कामगार साई यांनी पोहून नदीपात्रातील वीज वाहिन्यांवर अडकलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला केल्या. तसेच लाईनमन धकाले यांनी भर पावसात वीजा कडाडत असताना देखील इंसुलेटर्सचे तुकडे शोधून काढले. एटापल्लीचे उपकार्यकारी अभियंता राजेश खडसे व कनिष्ठ अभियंता आर. बी. पोहणकर, जे. टी, सानप व इतर कर्मचाऱ्यांनी झाडाला दोरखंड बांधून दोराच्या सहाय्याने पाण्यात जाऊन बिघाड शोधून काढला व वीज तारा ओढल्या. उपकेंद्र ५० ते ६० किमी दूर असतांनाही तसेच या भागात मोबाईल नेटवर्कचा अभाव व रस्त्यांची दुर्दशा असतांनाही वीज कर्मचाऱ्यांनी सतत चार दिवस परिश्रम घेत विद्युत पुरवठा सुरळीत केला. २४ जून रोजी दुपारी २ वाजता भामरागड येथील ३३ केव्ही लाईन चार्ज करण्यात आली. तसेच ११ केव्ही वाहिनी सुरू करण्यात आली. परंतु आलापल्ली येथील ६६ केव्ही वाहिनीत बिघाड झाल्याने कार्यकारी अभियंता हिवरकर यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ११ केव्ही वाहिनीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली.