शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
4
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
5
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
6
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
7
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
8
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
9
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
10
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
11
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
12
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
13
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
14
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
15
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
16
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
17
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
18
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
19
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
20
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांविना भामरागडची सेवा ठप्प

By admin | Updated: July 9, 2015 01:50 IST

तालुक्यातील हेमलकसा येथे भारतीय दूरसंचार निगमचे केंद्र आहे. येथे कर्मचारी कार्यरत होते.

दूरध्वनी केंद्र वाऱ्यावर : वीज, दूरध्वनी, मोबाईल बंद
भामरागड : तालुक्यातील हेमलकसा येथे भारतीय दूरसंचार निगमचे केंद्र आहे. येथे कर्मचारी कार्यरत होते. त्यांचे स्थानांतरण झाल्यानंतर मागील चार-पाच वर्षांपासून एकही कर्मचारी आला नाही. तेव्हापासून दूरध्वनी केंद्राचा कारभार चौकीदार सांभाळत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद झाला की मोबाईल सेवा बंद पडते. अनेकदा रेंज पकडत नसल्याने भामरागडच्या नागरिकांना दूरध्वनी, मोबाईल फोनवरून बोलण्यासाठी हेमलकसाला जावे लागते. हेमलकसा येथील दूरसंचार केंद्राच्या मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी आहे.
मागील दहा वर्षांपासून यासंदर्भात मागणी करून पाठपुरावा करण्यात आला. परंतु अजूनपर्यंत याबाबत निर्णय झालेला नाही. येथे कार्यालयासाठी कर्मचारीही नेमण्यात आला नाही. केवळ एका सुरक्षा रक्षकाच्या भरवशावर मोबाईल सेवा अनियमितपणे सुरू आहे. याबाबत अनेकदा दूरसंचार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आठवड्यात दोन दिवस ही सेवा सुरू राहते. त्यातही अनेकदा भामरागड कव्हरेजच्या बाहेर असल्याचे उत्तर मोबाईल देतो. तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे भ्रमणध्वनी सेवेच्या मनोऱ्याची रेंज वाढावी म्हणून पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु काहीही उपयोग झाला नाही.
कुणी मोठा अधिकारी, मंत्री येणार असला तर सेवा सुरळीत केली जाते. मात्र त्यानंतर पुन्हा सर्व आलबेल होते. वीज जाताच भ्रमणध्वनी, दूरध्वनीसेवा बंद पडून जाते. एकीकडे जिल्हाभर दूरसंचार विभाग थ्री-जी, फोर-जी सेवा पुरविण्यासाठी धडपत असताना भामरागडला मात्र असलेल्या साध्या सेवेसाठीही नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढावा, अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)