जीवनावश्यक वस्तूंसह विविध दाखल्यांचा मेळाव्यातून दिला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST2021-02-05T08:53:00+5:302021-02-05T08:53:00+5:30

धानोरा : पोलीस स्टेशन धानोरा व तहसील कार्यालय आरमाेरी यांच्या संयुक्त विद्यमाने रांगी परिसरातील जांभळी येथे १ फेब्रुवारीला ...

Benefit given from various certificates including essentials | जीवनावश्यक वस्तूंसह विविध दाखल्यांचा मेळाव्यातून दिला लाभ

जीवनावश्यक वस्तूंसह विविध दाखल्यांचा मेळाव्यातून दिला लाभ

धानोरा : पोलीस स्टेशन धानोरा व तहसील कार्यालय आरमाेरी यांच्या संयुक्त विद्यमाने रांगी परिसरातील जांभळी येथे १ फेब्रुवारीला जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात १७५ गरीब व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा लाभ देण्यात आला. तसेच विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या मेळाव्यात परिसरातील जवळपास पंधराश उपस्थित होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आरमाेरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट हाेते. प्रमुख अतिथी म्हणून आरमाेरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, धानाेरा पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक विवेक अहिरे, पाेलीस उपनिरीक्षक सतीश रेड्डी, अंजली राजपूत, जांभळीचे पाेलीस पाटील रमेश उसेंडी उपस्थित होते.

धानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले जांभळी हे गाव आरमाेरी तालुक्यात समाविष्ट आहे. हा परिसर अतिदुर्गम आहे. येथे पहिल्यांदाच जनजागरण मेळावा घेण्यात आला. यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. नागरिकांनी मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. सुरूवातीला गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्य व नृत्याद्वारे पाहुण्यांचे स्वागत केले. यामुळे पाहुणे सुद्धा भारावून गेले. या मेळाव्यात जांभळी, दवंडी, टेकाम टोला, माजी टोला, सरपंच टोला, शिवा टोला व परिसराच्या गावातील नागरिक सहभागी झाले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रामचंद्र टेकाम, काशिनाथ गोटा, नेताजी हुर्रा, शांताराम झुरी, सुरेश धुर्वे, हरिश्चंद्र उसेंडी, रामदास कुमोटी, परशराम हलामी व नागरिकांनी सहकार्य केले.

बाॅक्स

याेजनांच्या माहितीसह आराेग्य तपासणी

जनजागरण मेळाव्यात महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभागातर्फे स्टॅाल लावण्यात आले होते. पोलीस विभागातर्फेगरीब गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप याप्रसंगी करण्यात आले. आरोग्य विभाग धानोरातर्फे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. महसूल विभागाच्या वतीने विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले. कृषिविभाग, पंचायत समितीतर्फे विविध योजनांची माहिती देण्यात आली.

Web Title: Benefit given from various certificates including essentials