शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षारंभीच गाढवी नदी झाली कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST

महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व सीमेजवळील ढासगढ येथून उगम पावणारी आणि हजारो मीटर अंतर पार करून गडचिरोली जिल्ह्याच्या ...

महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व सीमेजवळील ढासगढ येथून उगम पावणारी आणि हजारो मीटर अंतर पार करून गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या आरमोरी तालुक्यातील शिवणी येथे वैनगंगा नदीत विलीन होणारी गाढवी नदी विसोरा तसेच देसाईगंज तालुक्यातील शेतकरी, नागरिकांची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातून वाहताना दोन्ही किनाऱ्यावरील शेकडो हेक्टर शेतातील पिकांना पाणी पुरवते. गोंदिया, गडचिरोली हा घनदाट अरण्यप्रदेश असून या भागात दरवर्षी चांगला पाऊस पडतो.

नदीच्या प्रवाहात काठावरच्या शेतांमध्ये पाणी पुरवण्यासाठी हजारो मोटारपंप लावले आहेत. मात्र अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव जवळच्या डोंगररांगांंच्या आड नदीचे पाणी अडवून इटीयाडोह धरण बांधले आहे. त्यामुळे नदीचा पाणी प्रवाह अनियमित झाला आहे. पावसाळ्यात धो-धो पाऊस आल्यावरच धरणाचे पाणी ओव्हर होऊन नदीतील पाणी प्रवाह संतत असतो. पण पाऊस बंद झाला आणि पाण्याचा ओव्हरफ्लो सुद्धा थांबतो आणि नदी पण कोरडी होण्यास सुरुवात होते. नदीच्या पात्रातील पाण्याचा वेग अनियंत्रित आणि जोराचा राहत असल्यामुळे रेतीचा चढउतार जागोजागी उभा होतो. त्यानेही पात्रातील पाण्याचा प्रवाह प्रभावित होतो. त्यामुळे काही ठिकाणी पात्र अरुंद झाले आहे. तसेच नदी काठावरचे झाडेझुडुपे तोडून नष्ट केली जात आहेत. त्याठिकाणी पात्र पसरट झाले आहे. हा सर्व परिणाम नैसर्गिक आहे.

परंतु नदीचा पाणी प्रवाह बंद होण्यास मानवनिर्मित कारणेही आहेत. पावसाळ्यात नदी प्रवाहातील पाण्याला जोरदार वेग असतो. परिणामी पाण्याच्या प्रवाहातील सर्व अडथळे दूर सारून पाणी प्रवाहित होते. जेव्हा पावसाळा संपला म्हणजे ऑक्टोबर नंतर नदीच्या पात्रात जेसीबी यंत्राने खोल खड्डे खोडून त्यात मोटारपंप लावले जातात. रेतीची पार बांधून पाणी अडविले जाते. त्यामुळे अल्पावधीत नदीचा प्रवाह कोरडा होतो. नदीकाठापासून काही नजीक वसलेल्या गावातील नागरिकाचा मृत्यू झाल्यास नदीच्या पात्रात मृतदेह जाळले जातात. त्यासाठी मोठाले लाकडी अर्धवट जळालेल्या अवस्थेत नदी पाण्यात तसेच फेकले जातात. तसेच गेली कित्येक वर्षांपासून स्वच्छ न केलेले नदी पात्र स्वच्छ करणे गरजेचे आहे.

नदी निव्वळ पाण्याला वाहून नेणारी एवढेच तिचे महत्त्व नाही तर प्राणी, पक्षी, वनस्पती, माती या सर्वाँच्या अनमोल अशा जैविविधतेला समृद्ध करणारी नैसर्गिक देणगी आहे. नदीकाठच्या शेतात धानपीक, अन्य खरीप, रब्बी पीके घेतली जातात. याही वेळी पीक लागवड सुरू आहे वा झाली आहे. तसेच उत्पादन सुद्धा बाजारात दाखल झाले आहे. नदीच्या पाण्यावर शेती पिकत असल्यामुळे अनेक कुटुंबांचा चरितार्थ सुरळीत चालत आहे. नदी कोरडी झाली कि पात्रात जागोजागी पाण्यासाठी खड्डे खोदलेले दिसून येतात. त्यामुळे पाणी तिथेच थांबते आणि प्रवाह बंद होतो. आता नदीच्या पात्रातील झाडे तोडून तिथे शेतीही केली जात आहे. याकडे पर्यावरण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे